पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm ram प्रकरण १८ वें. २२७ भरवणे.—मुलाचे पोषण जन्मापासून ९ महिनेपर्यंत केवळ दुधाने आणि नंतर ते दोन वर्षांचे होईपर्यंत दुधाबरोबर कांहीं धान्यसत्त्वे मिश्रित करून त्यांनी करावयाचे असते. मूल मोठे झाल्यानंतर ते ७ वर्षांचे होईपर्यंत मोठ्या मनुष्यांनी खावयाची पण निवडक पथ्यकर अन्ने त्यास देतां येतात. या कालमर्यादा ज्यास्तीत जास्ती अशा सांगितल्या आहेत. मुलाच्या प्रकृतिमानाप्रमाणे त्या कमीज्यास्त करता येतात. वरचे दूध- तान्ह्या मुलाची आई त्याला पाजण्यास दुर्दैवाने असमर्थ झाली, व उपमाता झणजे पाजणारी दाईही नसली, झणजे त्याला वरचे दुधावर वाढविण्याची पाळी येते. हे त्या मुलाच्या आयुष्यांतले एक मोठे संकटच झटले पाहिजे. ह्या प्रसंगाला मुलास भरवणारी बाई जितकी दक्षता ठेवील तितकी थोडी आहे. वरचे दूध मूळचे कितीही चांगले असले आणि कितीही काळजीपुरस्कर मुलाला दिले, तरी त्याला आईच्या दुधाची सर येत नाही. त्याशिवाय ते देण्यांत अनेक चुका होतात. त्या कळणे फार मुष्किलीचे असते, आणि त्या चुकांपासून वेळेस फार अनर्थ होतात. दूध तयार करणे.-वाग्भटांनी वरचे दुधांत शेळीचे दूध उत्तम ठरविले आहे. ते न मिळाल्यास गाईचे दूध शेळीच्या दुधासारखें करून पाजण्यास सांगितले आहे. हे करण्याचे हल्लींचे प्रकार दोन आहेत. (१) एक दूध कडकडीत तापवून त्यावरची साय काढून टाकितात. (२) दुसरा, दुधांत तितकेंच पाणी आणि चार-दोन वावडिंगें किंवा एकादी पिंपळी घालून ते मिश्रण-त्यांत घातलेले पाणी संपूर्ण जळून ते मूळच्या दुधाइतके राहिले ह्मणजे-गाळून घेऊन साय वगैरे काढून टाकितात.