पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ घरांतली कामें. स्पर्शाने आणि दृष्टीने समजण्यासारखे आहेत. जसे अंगाच्या एखाद्या भागास गांठ उठणे, सूज येणे, खरूज, फुनशी, कान वाहणे, डोळ्याला चिपडे येणे, वगैरे; आणि काही दिसल्यास त्याच्या उपायाला तत्काळ लागावें. मुलाचे तोंडांत, हिरड्यांवरून आणि ओठांच्या आंतून सांजसकाळ एकदा तरी बोट फिरवावें. दांत निघाल्यापासून ते सुपारीच्या, बदामांच्या सालांच्या, किंवा बकुळीच्या मातीच्या राखेने हळूच घाशीत जावें, अथवा इंग्रजी पद्धतीप्रमाणे बोटाला चिंधी गुंडाळून बोरासिक आसिड सोल्यूशनमध्ये बुडवून मुलाच्या तोंडांत फिरवावें. दांत. आल्यावर दंतमंजनाने किंवा वरील सोल्यूशनने दांत स्वच्छ करावे. मुलाच्या पहिल्या कोवळ्या दांतांस मोठाली दंतमंजनें नको आहेत. मुलास चाकचे किंवा दुसरें साधेसे मंजन योग्य होईल. - मुलाची नखें स्वच्छ ठेवावी. त्यांत मळ सांचू देऊ नये. ती वारंवार नीट काढावी. वांकडीतिकडी कशी तरी कापल्याने नखें बेढब होतात. काजळ घालणे-काजळ घालण्यापासून मुलांच्या कोवळ्या डोळ्यांना थंडावा राहन उष्णतेची शांति होते यांत काही सदह नाही. पण अलीकडे हे निरर्थक समजले जाऊ लागले आहे. त्यांत दोष हा आहे की ते घालतांना मूल रडते. पण त्याचा दोष काजळाकडे नसून ते घालणाराकडे आहे. घालणाराने तें युक्तीने घातले, तर मुलास त्यापासून खात्रीने सुख होईल आणि डोळ्यांचे रक्षण होईल. १ हे काजल नळीच्या तेलाचा दिवा करून त्याचे काजळ धरून ते तुपांत खलून करतात. लांत कापूर वगैरे दुसरे पदार्थ घातले तर ते अर्थातच चुणचुणतें.