पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwwwwwwwwww प्रकरण १८ वें. २२५ घालू नये. माने खाली आणि पाठीवर पुष्कळ पाणी घालावें. स्नान झाल्यावर कानांत कुंकर घालून त्यांतले पाणी उडवावें. अंग-पुसणे त्याच्या खालून घालून न्हाणीतून त्यास बाहेर उचलून घ्यावे. अंग आणि तोंड पुसून कोरडे करावें. संधींतून ओल राहू देऊ नये. लागलीच अंगांत कपडे घालावे. टाळूवर कायफळाची भुकटी भुरभुरावी. (ह्या भुकटीची खपली जमेल तर ती रोज काढण्याचा प्रयत्न करू नये. ती असते तोपर्यंत टाळूचे संरक्षण करिते आणि मग आपोआप पडते.) कपडे घातल्यावर आणखी त्यास काही वेळ मांडीवर राहूं देऊन त्याचे कौतुक करावें, दूध पाजावें आणि पाळण्यांत घालावें. ह्यापासून मुलाला पुष्कळ सुख होईल व तें थोड्याच वेळांत झोंपी जाईल. मुलांस नुसते तेल लावायाचे तर चार मिनिटे आणि स्नान घालावयाचे तर आणखी ४ मिनिटे वेळ पुरे आहे. त्याहून अधिक वेळ त्यास उघडे ठेवू नये. ग्रीष्म ऋतूंत तेलाचे प्रमाण आणि ते चोळण्याचा वेळ हिवाळ्यापेक्षा कमी करावा. मूल बसूं लागल्यावर त्यास गुडघ्यावर घेण्याची आणि तेल सर्वांगाला चोळण्याची मुळींच जरूरी नाही. फक्त डोक्याला तेल लावणे पुरे आहे. रोजरोज डोक्यावरून स्नान घालू नये. मुलाला वरचेवर न्हाऊ घातल्याने त्याला शैत्य किंवा पडसें होतें अशी कित्येकांची समजूत असते. पण ही समजूत चुकीची आहे. त्यांच्या हे कधींच लक्षात येत नाही की मुलाला शैत्य होण्याला त्यांचा स्वतःचा दीर्घसूत्रीपणा आणि दुर्लक्ष ही दोन कारणे होत असतात. मुलाच्या अंगास तेल लावतांना त्याच्या शरीरांत कोठे कांहीं फेरबदल होत आहे की काय, इकडे लक्ष द्यावे. हे फेरफार हाताच्या