पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ घरांतली कामें. wwwm mmmmmm दिवस उजाडण्यापूर्वी त्यांची झोपमोड करून स्नानाची गर्दी करणे योग्य नाही. ते त्यास दिवस उजाडल्यावरच घातले पाहिजे. मूल घामाने डवरले असेल तर घाम पुसून अंग चांगलें कोरडे होऊ द्यावें. तेल लावणारणीने लांकडी लांब फळीवर गुडघे पसरून बसावें. त्यांवर मुलाला त्याचे पाय आपले पायाकडे करून घ्यावे. टाळूच्या खळग्यांत तेल भरून ती अंमळ दाबली ह्मणजे तें तेल त्यांत जिरते. नंतर सर्वांगाला तेल लावावे. उराला, मानेला, पाठीला आणि तळव्यांना हलक्या हाताने तेल चोळावें. करंगळी तेलांत बुडवून नाकपुड्यांतून फारच हलके फिरवावी. दोन्ही कानांतून तेलाचे दोनदोन थेंब टाकावे. मूल चलनवलनावस्थेत आल्यानंतर त्यास तेल लावणे झाले ह्मणजे त्याच्या हातापायाला थोडा व्यायाम करवावा. त्याचे गुडघे पोटाकडे आणून एढीखाली कुल्याला लावल्यानंतर पाय लांब करावे. हात छातीवर आणावे, वर मानेकडे न्यावे, खाली कोपर पार्श्वभागाला चिकटवावे व नंतर हात लांब करावे. असे दोन तीन वेळां करावें. तेल लावणे झाल्यावर मुलाचे अंगावर पाणी डाव्या हाताने ओतून उजव्या हाताने छिडकल्यासारखें टाकावे. अंगाची मळी काढण्यास साबू वापरावा. तो नरम, तेलमिश्रित (उदा० ग्लिसरीन सोप, हनी सोप, किंवा पीयर्स सोप ) घ्यावा. साबूचा फेस हातावर काढून तो मुलाच्या अंगाला चोळावा. साबू त्याच्या अंगाला घासू नये. वरून पाणी घालून अंग स्वच्छ धुऊन काढावें. प्रथम डोळे धुवावे, साबणाचे पाणी डोळ्यांत न जाण्याची खबरदारी घ्यावी. सर्व संधिभाग, खाका, मांडया, गुडघे, हातापायांची बोटें, कानांचा मागील भाग, त्यांच्या पाळ्या, यांतून रोज मळ सांचतो तो स्वच्छ धुवून काढावा. डोके धुण्यास अवश्य पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी त्यावर