पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वें. ५ राखून ठेवावयाचे अन्न (१) पानपत्रावळीवर, ताटलीत, बशीत किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांत ठेवू नये. (२) ज्याचा कळंक किंवा वास लागेल अशा भांड्यात ठेवू नये. ( ३ ) एका पदार्थावर दुसरा पदार्थ दडपून ठेवू नये. (४) घट्ट अन्नास लावून पातळ पदार्थ ठेवू नये, (५) अन्न मोकळे पसरलेले ठेवू नये. (६) भुईबरोबर ठेवू नये. (७) पाणथळ, अथवा ओलसर जागेत किंवा मोरी जवळ ठेवं नये. (८) कोंदट हवेच्या किंवा बंद जागी ठेवू नये. (९) कुत्र्यामांजराला सहज उचलता किंवा ढकलतां येईल अशा झांकणाखाली ठेवू नये. ) वरील सर्व प्रकार असे आहेत की त्यापासून अन्न एकांत एक मिसळतें, सांडते, कळंकतें, कुजतें, नासते, उबतें, किंवा आळ्या, मुंग्या, मुंगळे, इ० येतात अथवा उंदीर, मांजर, मुंगुस किंवा कुत्रे यांस त्यांत तोंड घालण्यास सांपडते. ह्मणून अन्न फार व्यवस्थेनें व सुरक्षित राहील असें ठेविले पाहिजे. ६ अन्न झांकून ठेवावयाचें तें नीट व्यवस्थेने ठेवावें. पोळ्या ठेवावयाच्या असल्या तर एकीवर एक अशी त्यांची चळत करून ती दुमडतां येण्यासारखी असल्यास दुमडून ठेवावी. भात ठेवावयाचा असल्यास तो वाडग्यासारख्या एखाद्या भांड्यांत मुदेसारखा घालून नीट दडपून ठेवावा, ह्मणजे मऊ राहील. ७ अन्न ठेवण्यासाठी भांडे घ्यावयाचें तें कल्हई केलेले व न कळंकणारे असून आटपसर बेताचे असावें. त्याला अंगचेच घट्ट झांकण असेल तर फार चांगले. पितळी डबे किंवा अलीकडे फराळाचे डबे ह्मणून एका विशेष घडणीचे पूडदार डबे निघाले आहेत ते चांगले. डबा एकच पूडदार नसेल तर जरूरीप्रमाणे एकाहून