पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २२३ wwwmmmwww ^^AMAN wwwmanna तेलाचे कपडे फारच स्वच्छ धुवावे आणि खोलींतली घाण सुगंधि धुराने नाहीशी करावी. अति अशक्त, व अंग गार राहाणाऱ्या, मुलास रोज स्नान न घालतां, कधी कधी आणि दिवस बराच वर आल्यावर घालावें. मुलाला जुलाब किंवा उलट्या होत असतील किंवा कफ झाला असेल, ज्वर, डांग्याखोकला किंवा दृष्टिविकार झाला असेल, तर त्यांतून बरें होईपर्यंत स्नान घालू नये, किंवा अभ्यंग करूं नये. फार गार वारा सुटला असेल त्या दिवशीही स्नान घालू नये. तथापि स्नान घातले नाही तर त्याऐवजी ऊन पाण्यांत पिळलेल्या फडक्याने त्याचे अंग पुसून निर्मळ करावे. त्याला मळीण अगदी होऊ देऊ नये. कारण, अर्धे दुखणे नुसत्या स्वच्छतेने नाहीसे होते. समाजाला संध्याकाळचे तेल लावायाचे ते मूल झोंपी जाण्यापूर्वी लावावें,त्याकरितां त्याला आठ नऊ वाजेपर्यंत जागे ठेवू नये; किंवा झोपेतून जागे करूं नये. सकाळी देखील काम उरकून घेण्याच्या दृष्टीने लाक्षादि तेल तयार करणे फारसे कठीण नाही. त्याची साधारण रीति अशी आहे: लाखेचा काढा ४ शेर ( ८० तोळे=१ शेर ) शुद्ध तिळेल १ शेर दह्याची निवळी ४ शेर सुगंधि औषधि पदार्थ -1- शेर. हे मिश्रण मंद आंचेवर आढू द्यावे. पाणी निःशेष आटले ह्मणजे भांडे अग्नीवरून खाली उतरावे आणि तेल निवाले ह्मणजे गाळून कुपीत भरून ठेवावें. लाख बोरीची किंवा कुड्यांची घ्यावी. तिच्यांत चौपट पाणी घालून काढा करावा. एक पंचमांश उरवावा.