पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ घरांतली कामें. देखील थंड पाणी पाजल्याशिवाय गत्यंतर नसते. अशा ठिकाणी शीत उपचार करण्यास भिऊं नये. न्हाऊ घालणे. . न्हाणे ह्या शब्दांत अभ्यंग करण्याचा ह्मणजे तेल लावण्याचा समावेश होतो. आपले लोकांत तान्ह्या मुलाला सकाळचे स्नान अभ्यंग केल्याशिवाय घालीत नाहीत. सायंकाळी नुसतेच अभ्यंग करितात. सायंकाळच्या अभ्यंगांत तेलाचा उपयोग थोडा-केवळ अंग चोळण्यास सोपे जाण्यापुरता-करावा. - आपल्या जुन्या वैद्यक ग्रंथांत सांगितले आहे की, अभ्यंग (तेल लावणे ) सर्व शरीराला आणि विशेषेकरून डोके, कान आणि पायांचे तळवे यांना रोज करावें. ह्याने त्वचेला मार्दव येते, शरीर दृढ होते आणि निद्रा येते. स्नान केल्याने अंगाचा मळ, कंडु व घाम यांचा नाश होऊन अग्नि प्रदीप्त होतो, श्रमाचा परिहार होतो. बळ वाढते आणि तेज येते. ऊन पाणी डोक्यावर घालू नये. त्यापासून केसांस व दृष्टीस धक्का बसतो. मुलास भरवल्यानंतर लागलेंच स्नान घालू नये. ह्याप्रमाणे मुलाचे अंगास तेल लाविले असता त्यावर मळ जमतो. तो स्नानाचे वेळी अंगाला हरभऱ्याचे पीठ चोळून काढून टाकितात. तरी मुलाची पांघुरणें तेलकट होतात ती बरोबर धुतली जात नाहीत, त्यांना वाण येते आणि ती खोलीभर सर्वत्र पसरते; ह्मणून साधे तिळेल लावण्याऐवजी लाक्षादि सुगंधि तेल मुलाच्या आंगाला लावावें. १ सुगंधी तेलांच्या भपकेदार जाहिरातीला भुलून त्यांतल्या एकाद्या तेलाची नांवावरूनच निवड करू नये. कारण पुष्कळ तेलांत नांवाशिवाय दुसरे गुण कांही नसतात अशी तेलें मुलांच्या अंगास लावण्यास निरुपयोगी होत.