पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २२१ भुताखेतांच्या वगैरे गोष्टी सांगून भेवडावू नये; किंवा त्यांचे समोर तशा गोष्टी बोलूही नयेत. कांहीं मुलें रात्रीची झोंपेंत बिछान्यांत मुततात. पुष्कळदां जंतांच्या विकारामुळे मूल असें करिते. तरी जंत झाले असल्यास ते पाडण्याचा प्रथम उपाय करावा. केव्हां केव्हां पुष्कळ सावधगिरी ठेविली असतांही मूल मुतल्यावांचून राहात नाही; तेव्हां त्यास डॉक्टरास दाखवावें.पुष्कळ वेळां मोठ्या मुलांची बिछान्यांत मुतण्याची ही संवय रात्री जेवतांन त्यांना पाणी कमी पिण्यास देण्याने व निजण्यापूर्वी त्यांना मोरीवर नेऊन आणण्याने मोडते. अशा रीतीने ती संवय मोडावी. तिच्यासाठी त्यांस विनाकारण शिक्षा करूं नये. मुलांस सूर्योदयाला उठण्याची संवय करावी. ती त्याच्या जन्मभराला चांगली असते. सकाळचें उठणे आयुष्कर व आरोग्यकर आहे. सकाळीच जागे होऊन पुन्हां झोंपी जाणे आरोग्याला विघातक आहे. मुलाला उचलल्याबरोबर आंथरुणाची उलटापालट करून त्यास हवा लागू द्यावी. पुनः बिछाना घालण्यापूर्वी तासभर तरी त्यास हवा लागू दिली पाहिजे. तसेंच मुलास खोलीतून बाहेर आणल्यावर खोलीची सगळी दारे उघडून बाहेरची हवा आणि ऊन ही आंत येऊं द्यावी. ज्या देशांत उष्ण वारे अंग भाजण्याइतकें चालत असते, तेथें दिवसास खुशाल खोली शक्य तितकी थंड करावी. रात्रीचे मोकळ्या हवेत खुशाल मुलास घेऊन निजावें. अशी काही सोय केली नाही, तर मुलें माशासारखी तडफडतात, त्यांचा घसा कोरडा पडतो, आणि ती रोगास पात्र होतात. उष्ण प्रांतांत महिन्याच्या मुलाला