पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

•wwwwwwwwww २२० घरांतली कामें. mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm त्याची परवा केली नाही आणि आपला क्रम तसाच चालू ठेविला, ह्मणजे मग ते आपल्या आपणच निजू लागते. तें झोंपी जाईपर्यंत त्याचेजवळ बसणे, किंवा तें मध्येच जागे झाले असता त्यास उचलून फिरविणे, रडू लागले असता त्याची समजूत घालणे, उजेडाजवळ नेणे, अथवा ते निजल्यावर त्याची झोंप मोडेल ह्मणून घरांत गलबला न होऊ देणे वगैरे खोडी मुलांस लावू नयेत. लोक बोलत असोत, किंवा शेजारी गाणे-बजावणे चालले असो, त्यांत देखील मुलाला गाढ झोप यावी, त्याने चाळवू नये अशी त्यास संवय असली पाहिजे. त्याला निजावयास मांडीवर घेणे, डोलविणे, झोंके देणे, चोखावयास देणे किंवा दुसरा कोणचाही उपाय करणे इष्ट नाही. मूल आणखी मोठे झाल्यावर त्याची उजेडाची संवय मोडण्याचा दखाल विचार करावा. ज्या मलाला बिछान्यावर टाकल्याबरोबर शाप यत, आणि तीही गाढ येते, अशा सशक्त मलाला अंधारांत झोप यण काही कठीण नाही. पण अशक्त आणि झोंपेंत भिऊन उठमाया मुलाविषयी प्रश्न असतो. अशा मुलाची देखील ती संवय सांभाळणारणीला युक्तीने पुष्कळ कमी करता येण्यासारखी आहे. तरी त्यास अंधार करू नये. केवळ डोळ्यावर उजेड पडूं नये ह्मणून आडपडदा करावा, हा उत्तम मार्ग आहे. मुले भित्री होण्याला पुष्कळदां त्यांस सांभाळणारी माणसेंच कारण होत असतात. ती त्यांस बागुलबुवा उचलून नेईल वगैरे गोष्टी सांगतात, त्यामुळे त्यांच्या मनांत भीति बसते, आणि त्यांची कल्पनाशक्ति ह्या वयांत तीव्र असल्यामुळे ती भीति अनेक रूपांनी त्यांच्या मनावर विस्तारत जाते. ती इतकी की, मुले मोठी झाल्यावर देखील भित्री राहतात आणि त्यांची ती भीति काही केल्या जात नाही. तरी मुलांस बाळपणी जखिणींच्या,