पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.mamraamrawrammarwarwwwwwwwwwwwwwww wwww प्रकरण १८ वें. २१९ पांच महिन्यांचे झाल्यावर तिसऱ्या प्रहरी त्यास मुळीच निजू देऊ नये. तें सात-आठ महिन्यांचे होईपर्यंत सकाळचे, स्नानानंतर किंवा त्या सुमारास एकादा तास निजलेलें पुरे. पुढे दुपारची त्याची झोंप चांगली दोनतीन तासपर्यंत वाढवावी. मूल दुपारचे वेळी झोपलें नाही, तर तें तिसऱ्या प्रहरी निजतें आणि सायंकाळी चिडचिड करूं लागते. पुन्हां त्यास निजवावे तेव्हां तें पूर्वी जागल्यामुळे इतकें थकल्यासारखे झाले असते की, त्याला झोप येत नाही, आणि आल्यावर देखील तें स्वस्थ सुखाने पडत नाही. पुन्हा पुन्हां चाळवीत असते. मुलाला दुपारच्या झोपेची संवय ते चांगले सहा-सात वर्षांचे होईपर्यंत चालू ठेविली, तर फार चांगले. बाळपणीं जास्त झोप घेणारी मुलें मूळची कृश आणि अशक्त असतां पुढे अंगापिंडाने बळकट झालेली आणि ह्याचे उलट कमी झोंप घेतल्याने सशक्त मुले अशक्त व कृश झालेली पाहण्यांत आली आहेत. सायंकाळी मुलाला पहिली ३ वर्षे साडेसहाच्या सुमारास आणि तीन वर्षांपासून पुढे पांच वर्षांपर्यंत सात वाजण्याच्या सुमारास निजवावे. त्याहून पुढे त्यास जागवू नये. आणि रोजच्या नियमित वेळेत तसेंच काही विशेष कारण असल्याशिवाय झोपेत व्यत्यय आणूं नये. मुलाला नऊ-दहा वाजेपर्यंत जागे ठेवणे फार वाईट. त्यापासून त्याला अकाली वार्धक्य येते आणि तें अनेक रोगांचे मूळ होत असते. तान्ह्याला पहिल्या पहिल्याने नुसतें पाठीवर उताणें निजवावें. तें सहज वळू लागले व उपडे होऊ लागले झणजे त्यास उताणे न निजवितां कुशीस निजवावें. ह्या अवस्थेत उताणें निजण्यापासून त्याच्या माकडहाडाला अपाय होण्याची भीति असते. कूस बदलीत जावी. एकाच कुशीवर नेहमी निजवू नये. मुलास निजण्यास अंथरुणावर जागेंच सोडावें. थोड्या वेळांत तें निजतें. पहिल्या पहिल्याने तें असें टाकिलें असतां रडते, तरी आपण