पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ घरांतली कामें. महिन्यांचे झाल्यावर उपयोगी पडत नाहीत. ह्मणून कपडे एकदांच पुष्कळ न करतां लागतील तसे करावे. तरी प्रत्येक अवस्थेत कपड्यांचे निदान चार जोड पाहिजेत. जे लोक पुढील अवस्थांतही कामी पडावे ह्मणून अगोदरच ढिले कपडे करतात, त्यांस कपडे कशाकरितां घालावयाचे हेच माहीत नसते असें मटले पाहिजे. रात्रीचे कपडे वेगळे आणि दिवसाचे वेगळे असावे. रात्रीचे कपडे सकाळी बदलावे. सकाळचे कपडे रात्रीस मूल झोपी जाण्यापूर्वी बदलावे. अंगास लागून राहणारे कपडे धुतल्याशिवाय पुनः घालू नयेत. वरची वस्त्रे देखील एकदां अंगांत घातल्यावर उन्हांत किंवा वाऱ्यांत घातल्याशिवाय पुनः वापरू नयेत. 1. अंगांत घालावयाची वस्त्रे गारठली असतील, तर ती पाटावर पसरून त्यांवरून गरम पाण्याची बाटली फिरवावी; किंवा ती वस्त्रे आंचेवर टोपली घालून तिजवर पसरून गरम करावी किंवा आंचेवर दोरी बांधून तिजवर घालावी. पण अंगाला चटका बसेल इतकें ऊन वस्त्रही घालू नये. कपड्याचे सळ मोडावे. sathi 2 अंगावरील कपडा भरला अथवा फार मळला असतां लागलाच बदलून दुसरा घालावा, आणि शिलकीला आणखी दुसरा कपडा त्याच जातीचा नसेल तर तो लागलाच धुऊन वाळत घालावा. निजविणे-तान्ह्या मुलाला झोपेची फार अवश्यकता असते.त्याला जितकी जास्त झोप येईल, तितकी त्याची प्रकृति चांगली राहते. मूल जन्मल्यावर पहिले काही आठवडे २४ तासांतून २० तास झोप घेतें. ते ३ महिन्यांचे झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत १७-१८ तास झोंप घेते. दुसरे वर्षी बहुधा १२ तास रात्री आणि दोन तास दिवसा झोंपते. मूल मोठे होते, तशी त्याची दिवसाची झोप कमी करावी. तें