पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm.ar प्रकरण १८ वें. २१७ किंवा कटीच्या वरचे-खालचे वस्त्र जोडून एक केलेले पेहेरणे घालणे, पाठीकडे बटन लावणे, वगैरे प्रकार आपल्या लोकांना विशोभित दिसतात; म्हणून ते करूं नयेत. दोन वर्षांनंतर मुलाचे आणि मुलीचे कपड्यांत त्यांच्या जातीला शोभेसा फरक करावा. टोपडे किंवा टोपी सर्दी गरमी करितां निरनिराळ्या योग्य कापडाची करावी. कापड एकेरी किंवा दुहेरी लावावें. पण तिला मधून गादी घालू नये. ती निवळ लोकरीच्या कापडाचीही नको. जे कापड घ्यावयाचें तें जाळीदार किंवा विरळ पोताचे घ्यावें. मुलाचे कपडे करण्यांत आणखी एक धोरण हे असावें की, मुलाचा गळा, मान, कान, कपाळ, छाती, आंतडी, आणि पायाचे तळवे यांचे शैत्यापासून पूर्ण संरक्षण व्हावें. मानेला तर उन्हाचीही बाधा होता कामा नये. दोन वर्षांचें मूल होईपर्यंत रू भरलेले कपडे त्याच्या अंगांत घालू नयेत. तसेच त्यास बनियानीही घालू नयेत. आंतून घालायाचे कपडे रोज धुतां यावे ह्मणून त्यांला झालरी, फीत, वगैरे लावू नये. बटन सुती लावणे आणि कसे रुंद, जाड फित्यांचे लावणे चांगले. बिरड्यांच्या गुंडया लावू नयेत. कारण त्या काढण्या-घालण्याला फार त्रास पडतो. तसेंच टांचण्याचा उपयोग करूं नये. आणखी कपडे करण्यांत हे धोरण ठेवावें की, मलाचे अंगावर त्यांचे ओझें होऊं नये, किंवा त्यांनी त्याचे अंग जखडलें जाऊ नये. त्यांच्या प्रत्येक अवयवाचे व्यापार सुखाने होण्यास अगदी अडथळा होऊ देऊ नये. मुलांच्या वाढत्या शरीराला निरनिराळ्या अवस्थांत अंगाच्या बेताचे कपडे करवावे. पहिले दोन महिन्यांतले कपडे पांचवे सहावे महिन्यांत कामी येत नाहीत; आणि ह्या काळांतले कपडे मूल बारा