पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ । घरांतली कामें. असते. अति गरीबीला जाड खादीचे केले असतां हरकत नाही. छीट किंवा मांजरपाटासारखे कापड निरुपयोगी होय. त्यांत गरमी राखण्याचा गुण नसतो. मूल मान सावरूं लागेपासून त्याच्या पोटाला पट्टा गुंडाळणे सोडून द्यावें, अंगड्याच्या जागी सदरा किंवा चौबगली बाराबंदी घालावी. वरून ढिलासा कोट किंवा जाकीट व मांड्याला चोळणा घालावा. त्याच्या मध्यसंधीचा भाग मलमूत्रोत्सर्गाकरितां मोकळा ठेवावा. पायांत मोजे ढिले घालावे. हे गुडघ्याखाली राहतील इतके उंच असावे. मुलाला जर मलमूत्र नियमित वेळी करण्याची संवय लाविली असली, तर रात्रीचे वेळी (चोळणा आणि मोजे न घालतां) अंगांतल्या कपड्यावरून एक लांब पायघोळ सदरा केला असतां चालेल. नियमित वेळेच्या सुमारास हगण्याकरितां मुलास बाहेर धरले झणजे झाले. पण अशी संवय केली नसेल तर पायघोळ सदरा हा घालू नये. मूल अन्न खाऊं लागल्यानंतर त्याच्या हगण्यामुतण्यांत बराच नियमितपणा येतो. तेव्हां चोळण्याचा मध्य संधि खुला ठेवण्याची जरूरी नाही. ( ताणून लहान मोठे होणारे कमरपट्टीचे चोळणे बाजारांत आयते मिळतात.) ग्रीष्म ऋतूंत वरील सगळेच कपडे सुती किंवा तागाचे हवेत. हिवाळ्याकरितां सगळे गरम, आणि मध्यम ऋतुमाना. करितां अंगाबरोबर असणारे कपडे सुती आणि वरून घालावयाचे कपडे गरम हवेत. बारा महिने फ्लानेल किंवा गरमच कपडे वापरण्याची आपणा लोकांना काही अवश्यकता नाही.. मूल चालू लागल्यानंतर चोळण्याऐवजी ढिला पायजमा करावा, आणि पायांत जोडा घालावा. तो सहज काढतां घालतां यावा. (त्याला ह्या अवस्थेत बूट किंवा शूज घालू नयेत.) स्लिंगदार पँट, कमरपट्टा