पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

aaaaaaamramm प्रकरण १८ वें. २१५ rammarwana कपडे कसे असावे ?---मुलाचे कपडे मुलाचे शरीरावर योग्य होतील असे असावे. मुलाचे शरीर सुकुमार असते, त्याला स्पर्श सहन होत नाही, त्याला शैत्य आणि उष्ण थोडेही बाधा करते आणि त्याचे अंगाला घाम पुष्कळ येत असतो. ह्मणून त्याचे कपडे नरम, सहज घालतां-काढतां येण्यासारखे, हलके, शैत्योष्णापासून त्याच्या सर्वांगाचे रक्षण करणारे, घाम शोषणारे, साधे, व घरीं धुतां येण्यासारखे असले पाहिजेत. यामा मूल हालचाल करूं लागेपर्यंत त्याला एक एक वस्त्र घालणे पुरे आहे. ह्या अवस्थेतही आरंभींच्या, दहा दिवसांतल्याप्रमाणे, पोटासभोवती पट्टा गुंडाळणे तसेंच कायम ठेवावें. ग्रीष्मऋतूंत तो हवा तर थोडा अगोदर टाकून द्यावा. पट्टा बारीक, नरम पोताच्या गर्भरेशमी किंवा गर्भलोकरी कापडाचा करावा. तो सैलसा व छाती आणि पोटावरून दोन वेढे येतील असा लपेटावा, आणि त्याच्या खाली वर दोन्ही बाजूंस बंद बांधावे. तो मुळीच आवळू नये. त्यावरून अंगडे घालावें. । अंगड्याच्या आकृतीत सुधारणा करणे इष्ट आहे. ती अशी की, अंगड्याचा गळा समोरून न कातरतां आडवा रुंदीकडून कातरावा. त्यांत सरफीत घालावें मणजे त्याने गळा हवा तितका लहान मोठा करता येईल.गळ्याला उंच पट्टी लावावी. अंगड्याची लांबी कुल्ल्यापर्यंत करून खाली घेराला रुंद पट्टी लावावी. बाह्या ढिल्या अर्धा पंजा झाकेल इतक्या लांब कराव्या. उन्हाळ्याकरितां अंगडे जाड, पण मऊ, घट्ट पोताचें व कापसाच्या कापडाचे करावें. हिंवाळ्याकरितां मध्यम जाडीचे, निवळ लोकरी किंवा रेशमी अथवा गर्भलोकरी किंवा गर्भरेशमी कापडाचे करावें. लोकरी कापड फ्लानेलचे चांगले