पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ घरांतली कामें. wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww wwwwwwwwwaar वर असतात. हे कपडे बहुधा सुती, काळ्या रंगाचे किंवा छिटांचे केलेले असतात. सण थंडा, रेशीम महाग, लोंकर गरम आणि रू घातलेले कपडे अंगास उबवतात; ह्मणून ह्यांतल्या कोणच्याही कापडाचे कपडे मुलाचे अंगावर घालण्याचा फारसा परिपाठ नाही. - वरील तीन कपडे (कुंची, आंगडे आणि कुंचडे) यांत कुंची निरुपयोगी आहे. कारण, तिच्यापासून मुलाच्या पुढील अंगाचा बचाव मुळीच होत नाही. ती आतां प्रचारांतून जात चालली आहे. तिचा क्वचित् औपचारिक उपयोग करतात. दुसरें अंगडें. ते अंगांत असणे-नसणे सारखेच आहे. कारण, त्याचा गळा आणि छातीचा भाग सगळा खुला राहतो, त्याच्या घेराला मुलास उचलण्या-सांचलण्यांत वळकट्या पडून त्या अंगाखाली जातात. आणि त्याचा गळा व बाह्या इतक्या तंग असतात की, त्यांतून मुलाचे डोके आणि हात घालणे काढणे फार कष्टकारक होत असते. तिसरें कुंचडे किंवा टोपडे. हे योग्य काली योग्य शिरस्त्राण आहे. याच्या रचनेंत डोक्याला घाम न येऊ देणे, फाजील वाऱ्यापासून बचाव करणे, वगैरे गुण असावे तसे आहेत. मुलाच्या वस्त्राविषयीं जो हा हलगर्जीपणा आपल्यांत आहे, त्याला दोन समजुती कारण आहेत. एक ही की, मुलाचे अंग जितकें उघडे ठेवावे तितके ते बळकट होते आणि तितकी त्याला शीतोष्ण सहन करण्याची शक्ति येते. दुसरी समज ही की, कपडे थोडे दिवसांत फाटतात किंवा जीर्ण होतात, तेव्हां त्यांत पैसा खर्च करणे व्यर्थ आहे. ह्या दोन्ही समजुती तत्त्वतः योग्य आहेत. तरी त्या व्यवहारांत आणि विशेषेकरून मुलांच्या बाबतीत अगदी निरुपयोगी आणि अत्यंत अपायकारक आहेत.