पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें २ चुलीचें काम आटोपलें ह्मणजे लाकडे व निखारा बाहेर काढून लाकडे मोरीवर आणि निखारा चुलीपुढेच पाण्याने विझवावा, लाकूड एखाददुसरेंच असले तर दोन्ही ह्मणजे निखारा व लांकडे ही तेथेच विझविण्यास हरकत नाही. निखाऱ्याबरोबर राख ओढून घेऊ नये. विझविण्यासाठी पाणी हाताने शिंपडल्यासारखें घालावें. तांब्याने ओतूं नये. तसे केल्यास राख उडून ती आपल्याच अंगावर येते, आणि चुलीजवळ पाणी सांडून चिखल होतो. ३ जेवणीखाणी आटोपल्यावर शिल्लक राहिलेल्या अन्नापैकी जे. पनः खाण्याच्या उपयोगी येण्यासारखे आणि दुसऱ्या खाण्याच्या वेळेपर्यंत चांगले टिकण्यासारखे असेल तेंच राखून ठेवावें. ते तसे नसेल तर तें लागलीच देऊन टाकावें. ४ राखून ठेवण्याचे अन्न खरकटे वेगळे व बिनखरकटे वेगळे. ठविले पाहिजे. सोंवळ्याचे सोंवळ्यांत व ओंवळ्यांचे ओवळ्यांत ठेवावें.. १ अन्न जितकें सत्त्वयुक्त आणि चांगले परिपक्व केलेले असेल तितकें तें ज्यास्त टिकतें. भाकर, पोळी, भात, वरणाचा घट्ट गोळा इ. १०।१२ तास टिकतात. खार, बासुंदी, श्रीखंड इ दुधादह्याचे पदार्थ २४-३६ तास पर्यंत टिकतात. पदार्थ पाकवलेले चार सहा दिवस व तळलेले दोन तीन दिवस पर्यंत बिघडत नाहीत. २ खरकटें अन्न कोणतें व बिन खरकटें कोणतें ह्याबद्दलचे नियम सांगतां येणार नाहीत. तथापि सामान्यतः तुपातेलाने भाजून तयार केलेले (ज्यांत सावा संपर्कही नसतो त्यास निर्लेप ह्मणतात),दुधांत शिजविलेले किंवा अगोदर अग्नीवर भाजून मग त्यांत पाणी घालून शिजविलेले,वगैरे पदार्थास बिनखरकटें झणतात, आणि पाणी घालून शिजविलेल्या अन्नाला खरकटें ह्मणतात. सोवळ्याओवळ्यांत पुष्कळ भेद आहेत. पण स्थूल मानाने मुंज झालेली मलें व प्रौढ वयाच्या बायका सोवळ्याने जेवतात व ओंवळ्याचा स्पर्श झालेलें. अन्न खात नाहीत.