पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २१३ (७) ज्या त्या मनुष्याला त्याचा मुका घेऊ देऊं नये किंवा श्वासोच्छास त्याच्या तोंडावर टाकू देऊ नये. (८) त्यास ज्या त्या गोष्टींत रडवू नये, आणि केव्हाही चिडवू नये. (९) त्यास कृतीने किंवा गोष्टी सांगून भेवडावू नये. एरव्हीं तर काय, पण तें सांगितले समजावलेलें ऐकत नसेल तरी सुद्धा असें करूं नये. मूल एकदां भ्यालें तर त्याची ती भीति निघत नाही, व त्यामुळे एकादे वेळी प्राणान्त कष्ट होतात. (१०) त्याच्या इच्छेप्रमाणे करावे. त्याचा उत्साह वाढवावा. साहस वाढवावे. त्याला जेव्हां तेव्हां हटकू नये, किंवा दडपूं नये. इजा होण्यापासून मात्र वांचवावें. (११) त्याने ऐकलें नाहीं तरी त्यास अपशब्द बोलू नये. धास्ती धरील असें रागें भरूं नये. बागुलबुवाची भीति दाखवू नये. थोडी नासधूस केली ह्मणून भडाभडा बडवू नये. डोक्यावर तर कधींच मारूं नये. उपाशी ठेवण्याची शिक्षा देऊ नये. नामा (१२) वस्त्राचा (लुगड्याचे पायघोळाचा) वारा, परक्या, मळीण, रोगट माणसाचा स्पर्श आणि कोणी त्याची ओलांड करणे, यापासून त्यास जपावें. अंगांत घालणें-आपले लोकांत मुलाचे अंगांत आरंभी १० दिवस मुळीच कांहीं पेहरणे घालीत नाहीत. एकादें पातळ, जीर्ण, टाकाऊ असें फडके पोटावरून गुंडाळतात, अकरावे-बारावे दिवशी कुंची घालतात. ह्यापुढे अंगडें कुंचडे ( अर्धी कुंची ) ही दोन वस्त्रे येतात. ( अंगडे ह्मणजे सदरा ). तीन महिन्यांपुढे मुलाच्या डोक्याला अंमळ आकार आल्यावर कुंचड्याचे जागी टोपडे घालतात. सामान्यतः एवढेच कपडे बारशापासून तो एक वर्षपर्यंत मुलाचे अंगा