पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ - घरांतली कामें. naamarrrrrrrrrrrrrrrrrrrrrror मुळेच ते रडते. ह्मणून दुधाची वेळ झाल्याशिवाय तें पाजू नये. रडण्याचें कारण शोधून काढावें. ते केव्हां खालचे बाळंत भिजल्यामुळे, केव्हां डासमच्छर चावल्यामुळे, केव्हां थंडी किंवा गरमी लागल्यामुळे, केव्हां झोपेत भ्याल्यामुळे आणि केव्हां शरीरांत दुखणे झाल्यामुळे रडतें. शेवटले कारण तपासण्यासाठी त्याच्या निरनिराळ्या अंगावर हात ठेवून पाहावा. ज्या अंगावर हात ठेवल्याने मूल रडेल तें अंग दुखतें असें समजावें. रडण्याचे कारण समजले झणजे मुलाला उगी करण्याचे काम फार सोपे जाईल. अशक्त मुले बहुतेक आणि सदृढ मुलांपैकी एकादें जन्मतःच किरकिरें, रडके व हट्टी असते. त्याचे कशानेही समाधान होत नाही. अशा मुलाकडूनही आहार आणि विश्राम काळजीपूर्वक, यथायोग्य करविले असतां त्यास बरेंच सुख होते. सामान्य नियम-मुलाला सुख होण्यासंबंधानें खालील साधारण नियम लक्षात ठेवण्यासारखे आहेत (१) त्यास सुख होईल अशा रीतीने मांडीवर घ्यावे. (२) वाकडे तिकडे बसवू नये किंवा स्वतः बसतां येण्यापूर्वी बसवू नये.. ( ३ ) एकाच हाताने ओढून किंवा त्याचे हात उंच करून खवाट्यावर उचलू नये. उंच उडवून झेलू नये. दुसरे कोणी असें करील तर मुलाला त्याचे हातून तत्काळ घ्यावें. (४) त्यास एकदम उंचावरून बिछान्यावर टाकू नये, किंवा झोपेतून एकदम जागे करूं नये. (५) त्याला अवश्यकतेवांचून अगदी अंगावर घेऊ नये. (६) त्याला उंच सखल जागेवरून आणि पाणी व अग्नि यांपासून जपावें. मेघांची गर्जना, बंदुकींचे आवाज, कर्कश वायें, रडारड वगैरे होत असेल तेव्हां मुलास पोटाशी धरावें.