पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

amaa wwwwxxxmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm प्रकरण १८ वें. २११ बागेत खेळण्या-हिंडण्याच्या मिषाने सकाळी व तिसरे प्रहरी चालवावें. त्यास बाहेर मोकळ्या हवेतून न्यावयाचे, तें गाडीतून नेऊन तेथे पोहचल्यावर त्याला अप्रत्यक्ष रतिीने पायी फिरवावे. खेळविणे-मुलाच्या प्रथमावस्थेत पाळण्यावर कापडी किंवा लांकडी झुंबर बांधण्याविषयीं वर लिहिलेच आहे. दोन महिन्यांनी मूल हातापायांचे आंगठे चोखू लागते. तेव्हां त्यास तसे करूं देऊं नये. त्यापासून दांत वांकडे तिकडे उगवण्याची किंवा ओठाबाहेर येण्याची भीति असते. मुलाला लांकडी चोखणी किंवा पितळी खुळखुळा द्यावा, तें बसू लागते तेव्हां त्यास फिरकी, भोंवरा, चिनी किंवा धातूची पशुपक्ष्यांची चित्रे, किंवा रबराची उडणारी, नाचणारी, किंवा वाजणारी अशी चित्रे द्यावी. ते रांगू लागते तेव्हां चेंडूसारखी वाटोळी किंवा चाकांवर चालणारी चित्रे चावी, आणि ते चालू लागते तेव्हां पांगूळगाडी किंवा चाकावरचे घोडे द्यावे. तान्ह्या मुलास तीक्ष्ण अणींचें, घशांत जाणारे, रंग सोडणारे, विषारी, भीतिकारक व जड असे खेळणे देऊ नये.' शांत करणें-मूल रडले की त्याला दूध पाजावयाचे, मांडीवर घ्यावयाचे, घेऊन फिरावयाचे, किंवा गाणे ह्मणावयाचे, असे त्याच्या रडण्याचे गोडवे करूं नयेत. मूल दिवसांतून एकदोन वेळां चांगले खडसून रडलेले चांगले. त्यापासून त्याची छाती मोकळी होते. ह्मणून त्याच्या रडण्याची एकादे वेळी उपेक्षा करावी. कारण, ते केव्हां केव्हां केवळ झोंपेला आले झणजे देखील रडते. ते दरवेळी कांहीं दूध पिण्याकरितांच रडत नाही. केव्हांतर त्याचे पोट दुधाने तुडुंब फुगल्या १ क्रीडनकानि खल्वस्य तु विचित्राणिघोषवंत्यभिरामाणि अगुरुण्यतीक्ष्णाग्राणि अनास्यप्रवेशीनि अप्राणहरानि अवित्रासनानिस्युः । चरक.