पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० घरांतली कामे. mammina हवेत गारवा किंवा उष्णता नसेल, त्या दिवसांत मुलास बाहेर फिरावयास न्यावें; किंवा मोलकरणीबरोबर पाठवावें. दिवसाउजेडी फिरवून आणावें. गांवाबाहेर, मोकळ्या हवेत, गुराढोरांची किंवा माणसांची वर्दळ नसेल अशा शांत, सपाट, सारख्या सडकांवरून फार सावकाशपणे न्यावें. गाडी ढकलणाराने गाडीकडे दुर्लक्ष करून मध्येच कोठे गप्पा मारीत बसू नये. गांवठी गाडी आणि गांवठी रस्ते ही दोन्हीं मूल दोन वर्षांचे होईपर्यंत त्यास फिरवण्यास निरुपयोगी आहेत. तरी इंग्रज लोकांचें अनुकरण करावयास जाऊन तान्ह्या मुलाचे हाल मात्र करूं नयेत. । मुलास बाहेर नेतेवेळी डोकीचे कुंचवें हलके व विरळ विणकरीचे घालावें. तोंडावर रुमाल घालू नये. पण उन्हाळ्याशिवाय इतर दिवसांत आंगावर हलकीशी शाल घातली तर चांगले. त्याच्या हातापायाला गारठा बाधूं नये, इकडे विशेष लक्ष ठेवावें. हो पायींचालविणे.--मुलाचे पाय शरीराचे ओझें उचलण्यास समर्थ झाले झणजे ते आपले आपण पाऊल टाकू लागते, आणि थोडे दिवसांनी मोठ्या डौलाने चालते. सांभाळणारणीने त्यास बेळ चालवू नये. त्यापासून ते कुबडे किंवा फेंगडे होण्याची भीति असते. शिवाय, मुलाकडून अतिरिक्त परिश्रम घेतले असता, त्याच्या शरिराला थकवा येतो. त्याला हवी तर एक पांगूळगाडी करून द्यावी आणि स्वच्छंदाने चालू द्यावें. - मूल चालू लागल्यावर ते कधीच स्वस्थ बसून राहत नाही, त्याच्या येरझारांत मैल अर्ध्यामैलाचा चक्कर सहज होतो. तें पायांवर चालून दमते, तेव्हां गुडघ्यांवर चालू लागते. हे दोन्ही प्रकार चांगले आहेत. अशा मुलाला दूर चालत नेण्याऐवजी आंगणांत किंवा