पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २०९ पुष्कळ मुले त्यांस ह्या अवस्थेत कडेवर घेतल्यामुळेच फेंगडी होतात; ह्मणून त्यांस गाडीत न्यावे हे उत्तम. तिच्या अभावीं सांभाळणारणीने आपल्या हाताची खुर्ची करून तींत मुलाला बसवावें.मुलाचा भार आपले छातीकडे असू द्यावा. मूल जड असलें व माणसांच्या गर्दीतून किंवा लांब अंतरावर त्यास न्यावयाचे असले, तर त्यास आपले पाठीशी उभे करून बांधावें. असे की, त्याचे गळ्याखालून सगळे अंग पायांसकट बांधलेल्या वस्त्रांत यावे आणि बंधनाचा एक पदर उचलणाराचे एका खांद्यावरून आणि दुसरा पदर दुसऱ्या खाकेखालून पुढे आणून, छातीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूवर दुहेरी गांठ द्यावी. हा प्रकार देखील मुलांसाठी माणसाने किंवा जनावराने ओढून न्यावयाची गाडी मिळण्यासारखी नसेल तेव्हांच करावा. मुलास खांद्यावर किंवा डोकीवर बसवून नेणें गांवढळपणाचे लक्षण समजले जाते. मुलास कडेवर बसवून नेण्याच्या प्रकारांत नेणाराचा एक हात पूर्ण मोकळा राहतो, हा एक बरेपणा आहे. त्याच्या उलट त्यांत दोष पुष्कळ आहेत. त्यांतल्या त्यांत त्याचे अति वाईटपण चालत्याबोलत्या मोठ्या मुली-मुलाला विशेष विचार न करतां कसल्याही प्रतीच्या गडीमाणसाच्या कडेवर देण्यांत आहे. हिंदुस्थानांत किती. एक जातींत मुलांस कडेवर घेत नाहीत, आणि हिंदुस्थानाबाहेर तर हा प्रकार कोणास ठाऊकही नाही. तरी आपले लोकांतही ही चाल जितक्या लवकर मोडेल तितकें इष्ट आहे. गाडींत नेणे-मुलांच्या निरनिराळ्या अवस्थेत त्यांना फिरविण्यासाठी निरनिराळ्या सोईच्या, माणसाने मागे चालून पुढे ढकलीत नेण्याच्या वगैरे गाड्या केलेल्या असतात; त्यांतली जरूरीप्रमाणे एखादी उपयोगात आणावी. मात्र मूल चलनवलनावस्थेत येईपर्यंत गाडीचा उपयोग न करणे बरें. १४