पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ घरांतली कामें. हातावर घेणे-मूल मान सावरूं लागेपर्यंत त्यास हातावर फिरवावे. मुलास हातावर घेतांना बरेचसे वस्त्र त्याचे अंगाखाली घ्यावे आणि वरूनही गळ्यापर्यंत पांघरवावें, ह्याप्रमाणे त्यास हातावर घेऊन घरांत, मोकळ्या दालनांत किंवा पडवीत ऊन नसेल तेव्हां रोज दिवसांतून तीन-चार वेळां फिरवायास हरकत नाही. पण प्रत्येक वेळी पंधरा मिनिटांहून जास्त फिरवू नये. तेव्हां त्याला उभे घ्यावे. एकाच हातावर घेतल्याने मुलाचे एकच अंग दाबले जाते आणि सांभाळणारणीचाही हात दुखू लागतो. मामाहा हात पाता. . मूल सांवरूं लागले आणि त्याच्या हाता-पायांला अंमळ दृढता आली म्हणजे त्यास सांभाळणाराने अमळ उलटून पालटून आपले डावे आणि उजवे छातीवर उभे धरून एक डावा हात त्याचे कुल्याखाली आणि दुसरा मानेखाली द्यावा. पुढे पुढे दुसरे कमरेला हाताचा टेका देणे पुरे होते. मूल चलनवलन करूं लागते, तेव्हां त्यास स्वभावतःच पुष्कळ व्यायाम घडत असतो. तरी त्यास बाहेरची मोकळी हवा मिळणे अवश्यक आहे. ती मिळवून देण्यास गाडी नसली, तर त्यास छातीवरच धरून नेले पाहिजे. ही गोष्ट मोकळी हवा घरापासून विशेष दूर नसेल तर साधण्यासारखी आहे. कारण त्यास छातीवर धरणे एके वेळी अर्ध्या तासाहून अधिक इष्ट नाही आणि शक्यही नाही. जवळपास एकादी बाग असेल, तर तींत फिरविणे योग्य होईल. कडेवर घेणे-मूल बसू लागल्यापासून सपाटून सारखा शरीराचा व्यापार करिते आणि त्यास मुबलक व्यायाम घडतो. त्यास ह्या अवस्थेत बाहेर न्यावयाचे झाले, तर कडेवर नेण्याची आपले देशांत चाल आहे. पण ह्यावेळी त्याच्या तंगड्या दृढ झालेल्या नसतात.