पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २०७ wwwwwwwwwwwwwner मूल उराने सरकण्याच्या अवस्थेत आल्यावर त्याच्या दोन्ही बगलांत हात घालून खवाट्यावर उभे उचलता येते. मूल बसू लागल्यावर त्याला मांडीवर बसवून डोलबाई करण्यापासून त्यास व्यायाम घडून सुख होतें. तरी फार वेळ तसे करूं नये. आणि झोप्याबरोबर डोके सोडून आपटू देऊ नये. मांडीवर घेऊन मुलाला निजावयाची संवय लावणे, किंवा झोप येण्याकरितां मांडी सतत हालवून त्याच्या शरीरास झोके देणे, वगैरे प्रकार त्याच्या आरोग्याला अपायकारक होतात. मूल दोन महिन्यांचे झाल्यावर त्याला उघड्यांत-हवेत गारठा किंवा उष्णता फारशी नसेल तेव्हां-पलंगडीवर किंवा भुईवर काहीं आंथरून दिवसांतून एक-दोन वेळ तास-दोन तास टाकावें, ह्मणजे ते तेथे आनंदाने खेळते, हात चाळवतें, लाथा झाडतें, व केव्हां मान वळवते. ह्यापासून त्यास व्यायाम घडतो, व त्याची अंगें दृढ होतात. ह्मणून त्याला तसे मनःपूर्वक करू द्यावे. अंगावर जड वस्त्र घालून त्यास प्रतिबंध करूं नये. त्याच्या जवळ बसून त्याचे हे चाळे पाहण्याची गंमत असते. सांभाळणारणीने त्याला अशा स्थितीत एकटें मात्र टाकू नये. मुलाला व्यायाम घडण्याकरितां बाहेर फिरावयास न्यावें. आचार असा आहे की, बाळंतिणीने चवथे महिन्यांत मुलाला घराबाहेर ग्रामदेवसेच्या दर्शनास न्यावें. सांप्रत महिना-दीड महिन्याच्या बाळंतिणी बाहेर पडतात, आणि मुलास वागवतात. इंग्लंड देशांत पंधरा किंवा आठ दिवसांच्याही मुलाला हवा स्वच्छ असली, तर वसंतऋतूंत बाहेर फिरावयास नेतात. हेमंत ऋतूमध्ये ते महिन्याचे झाल्याशिवाय नेत नाहींत.