पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ घरांतली कामें. ह्मणणे, थोपटणे वगैरे उपचार करूं नयेत. मुलाला बळें निजविल्यापासून ज्वराची कणकणी येण्याचा संभव असतो व त्याच्या नेहमींच्या झोपेत प्रत्यवाय होतो. ती जितकी स्वस्थपणे, शांतपणे व्हावी तितकी होत नाही, आणि मुलास अशा उपचारांची एकदां संवय जडली झणजे मात्र ते केल्याशिवाय त्यास चैन पडत नाही. गाणी वगैरे ह्मणावयाची ती नुसती मौजेखातर आणि मुलाला रमविण्याकरितां ह्मणावयाची असतात. ' पाळण्यांत ओल राहूं देऊं नये; बाळंत बघत जावे आणि भरलें असतां बदलावें. गादी व दुसरी आंथरा-पांघरावयाची वस्त्रे, तिसरे चवथे दिवशी वायांत किंवा उन्हांत प्रहर-सहा घटका घालावी, पाळण्याचे सांदींतून ढेकूण पाहत जावे. मूल पाळण्यांतून खाली पडणार नाही किंवा आगीच्या ठिणगीने त्याची वस्त्रे पेट घेणार नाहीत याविषयी खबरदारी ठेवावी. मुलाला रात्रीचे पाळण्यांत निजवू नये. मुलाला घेणे-मुलाची उचलसाचल ते स्वतः मान धरीपर्यंत फार हुषारीने केली पाहिजे. ह्या अवस्थेत मुलाच्या शरिराची संधिबंधने दृढ झालेली नसतात; ह्मणून त्यास हाताच्या केवळ पंज्यावर उचलले असता, त्याचे अंग मोडण्याची भीति आहे. तरी ज्यास तान्ह्याला जपून उचलता येत नसेल, अशाला उचलू देऊ नये. हवें तर आपण त्याचे मांडीवर द्यावे आणि आपणच उचलून घ्यावे. मूल वळू लागल्यावर आपले डावे हाताचा पंजा त्याचे मानेखाली आणि उजवे हाताचा कंबरेखाली देऊन त्यास आडवें उचलण्यास हरकत नाही. त्याचे उजवे हातावर डोके आणि डावे हातावर कमरेचा भाग घेणे अशुद्ध आहे.