पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २०५ असते. पण थंडीच्या दिवसांत ही भीति मुळींच धरावयास नको. आणि रू दोन वर्षांचा जुना घेतला, तर त्यांत गरमी झणण्यासारखी नसते. रुईच्या ऐवजी फर्नस्, नारळाचा काथ्या, किंवा गव्हा-तांदळांचा भूस, ह्यांपैकी हवें तें गादीत घालावें. पण परांची किंवा केसांची गादी घालू नये. ___ मूल वळू लागेपर्यंत उशी घालण्याची अवश्यकता नाही. नंतर गोल आकृतीची चपटी उशी डोक्याखाली घालावी. पडदा किंवा मच्छरदाणी, सबंध पाळण्यावर किंवा डोक्याचे बाजूने घालावी; झणजे प्रकाश व वाऱ्याचा झोत आणि चिलटें--मच्छरें, यांपासून तान्ह्याचे रक्षण होईल. झापीच्या (जपानी). पाळण्यांत दोन झापी एकीस एक असा जोडलेल्या असतात की, एका झापीत मुलास निजवून दुसरी झाप डोक्याकडून वर आड करता येते. शेगडी बाजूस ठेवून खोलीतली हवा गरम होऊ द्यावी. पाळण्याचे खाली किंवा जवळ शेगडी ठेवू नये किंवा हवा आंत गेल्यास प्रतिबंध करूं नये, मुलास ऊब देण्याकरितां लोंकर भरलेली लांबशी उशी किंवा गरम पाण्याने भरलेली रबरी बाटली शेजारी ठेवावी. किंवा गरमपाण्याचे बाटलीने अंथरूण शेकून काढावें. पण चटका लागण्याइतकें कढत करूं नये. मुलाचे मन रमण्यासाठी पाळण्यावर एखादे कापडी किंवा लांकडी झुंबर बांधावें, मूल हात-पाय हालवू लागले असतां त्या झुंबरास मुलाचा हात पोहचेल इतकें खालीं तें टांगावें. मूल पाळण्यांत घातल्यावर खेळत राहील, स्वस्थ पडेल, किंवा झोंपेल, स्वेच्छेने तें करील तें त्यास करूं द्यावें. आपण त्यास बळेच कांहीं करावयास लावू नये. त्याने निजावें ह्मणून झोंके देणे, गाणी