पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ घरांतली कामें. मुलास पाळण्यांत निजविण्यापासून त्याला सुख वाटते. ह्मणून पाळणा, आंथरूण, पांघरूण आणि तत्संबंधी अवांतर गोष्टी सोयीच्या व सुखोत्पादक होतील अशा कराव्या. या का पाळण्याचे प्रकार-पाळणे पुष्कळ प्रकारचे करतात. कापडाची झोळी, बांबूचे किंवा वेताचे टोपलें, पाटी, झाप, लांकडी पाळणा, तारेचा पाळणा वगैरे. पाळणा आंतून-बाहेरून रेशमी किंवा साध्या गाद्यांनी मढविणे, त्यास तरत-हेच्या झालरी लावणे, त्यावर चित्रं मढविणे, वगैरे प्रकार पैशाचे आणि हौसेचे आहेत. पाळणा कशाचाही केलेला असो, तो तकलादी, उथळ, सांकडा, व झोल पडलेला नसावा. त्याच्या बाजू जाळीदार असाव्या व तो जमिनीपासून दोन फूट उंच रहावा. * पहारका के तान्ह्याच्या आंथरूण-पांघरुणाची वस्त्रे आटपसर, थोडी, ऊबदार व नरम असावी. आंथरुणाला तळाशी कांबळयाचा किंवा गोणपाटाचा तुकडा, वर बारीकशी रू भरलेली गादी, त्यावर मेणकापड ( मॅकिंटाश ), चादर, आणि बाळंतें ही एकावर एक घालावी. पांघरण्याला बारीकशी रजई, नरम लोकरीचे जाड कांबळे, पासोडी किंवा चादर, ह्याप्रमाणे एक किंवा अनेक ऋतुमानाप्रमाणे घालावें. गादीमध्ये रू घातला असतां, तो गरम असल्यामुळे, तान्ह्याच्या अंगाला पुरळ आणील ह्मणून घालू नये, असे काही लोकांचे ह्मणणे

  • पाळण्यासंबंधाने पुढील समजुती आपल्या लोकांत चालत आल्या आहेत. (१) घरी पाळणा बनवू नये, तो आयता घ्यावा. नांदत्या घरचा मागून आणलेला पाळणा चांगला. ज्यांत एकादें मूल मेले असेल, तो पाळणा उपयोगांत आणूं नये.

(२) पाळण्यास पाठ लाविल्याने पाळणा चालू राहण्याचे ( मुले होण्याचे ) वंद पडतें. ( ३ ) रिकाम्या पाळण्यास झोंके दिले असतां मुलाचे पोट दुखते वगैरे.