पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वें. ११ फरसबंदी किंवा चुन्याने पक्क्या केलेल्या जमिनीवर सडा घालण्याचे बिलकुल कारण नाही. त्यापासून जागेला अधिक स्वच्छता न येतां उलट घाण मात्र होईल. तसेंच चुना पोतलेली किंवा रंग दिलेली भिंत असेल अशा जागीही सडा घालू नये. अशा जागी नुसत्या पाण्याचा शिडकाव करावा. फुलझाडांना पाणी घालण्याचा हजारा असतो, तो या कामासाठी घेतलेला अधिक चांगला १२ सडा घालणे झाल्यावर हातपाय वरपर्यंत चांगले स्वच्छ धुवावे. हाताला वास आणि नखांतून मळ अगदी राहू देऊ नये. वास जाण्यासाठी हातांला पाहिजे तर थोडी माती लावून ते धुवावे, आणि लागलीच कोरडे करावे. तसेच ओलेत्याने वापरू नये. प्रकरण ५ वें. चूलपोतेरें. १ चूलपोतेरें ह्मणजे चुली पुढली जागा सावडून पोतेयाने ती सारवणे. हे जेवणींखाणी आटोपल्यावर करावयाचे असते. क्वचित् जेवणीखाणी होण्यास फार उशीर असला किंवा दुसरीकडे जेवण्यास जावयाचे असले तर पोतेरें घालण्याचे काम स्वयंपाक आटोपतांच करतात. १ बायकांना शेण, माती, व राख यांत हात व नखें वाढल्यास त्या नखांत ती घाण जमून बस पिण्याच्या पदार्थासही होतो. यांसाठी वायकांन वाढू देऊ नयेत. हात धुतांना नखांतून दुसरें नख काढून हात धुवावे. 4 आहेत । एकाहूनः