पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २०३ मुलांस सुखविणे--मूल जन्मल्यावर पहिल्या दहा-बारा दिवशी त्याची उचल-साचल फारशी करीत नाहीत. कांकी, ह्या दिवसांत त्याची त्वचा अतिशय कोमल असते. तिला स्पर्श सहन होत नाही. आणि त्याला स्वस्थ पडू देणे जरूरीचे असते. त्याची आई ह्या दिवसांत खाटेवर स्वस्थ पडत असते. तसेच तिच्या शेजारी तिचे बालक असते. आईला ह्या त्याच्या जवळपणामुळे जागचेजागी वरचेवर पाजता येते, ही मोठी सोय आहे. तिच्या अंगची ऊब मुलाला भरपूर मिळते व उंदीर-मांजरांपासून त्याचे संरक्षण होतें. मुलाला आईची ऊब मिळण्याच्या अवश्यकतेसंबंधाने आपल्या लोकांचे बहुतेक एकमत आहे. इंग्रज लोकांत मात्र याविषयी मतभेद आहे. पुष्कळ इंग्रज लोकांना वाटते की, मुलाला आईच्या पुढ्यांत निजविण्यांत उलट तोटे आहेत. एक तर आईच्या श्वासोच्छ्वासाने दूषित झालेली हवा मुलाच्या पोटांत जाते आणि दुसरा हा की, आईकडून गैरसावधपणे मूल चेंगरले जाण्याची भीति असते. शिवाय, आईला किंवा सांभाळणारणीला आपले हातून असे होऊ नये ह्याची सारखी धास्ती बाळगावी लागते. ह्मणून ते ह्मणतात की, मुलाला वस्त्रप्रावरणांच्या उबेशिवाय आणखी ऊब पाहिजे, तर ती कृत्रिम उपायांनी द्यावी. माना मूल १०।११ दिवसांचे झाल्यावर त्यास आईपासून अंमळ वेगळे करण्याचा काळ येतो. मुलास पाळण्यांत घालाण्याचा आचार जणूं काय या गोष्टीची सूचना करीत असतो. (१) मुलास सुखविणे; (२) अंगांत घालणे; (३) निजविणे; (४) न्हाऊं घालणे; (५).भरवणे; (६) औषधउपचार; (७) चांगल्या संवयी लावणे; ह्यांपैकी पहिली तीन कामें मुलींस सहापासून अकरा वर्षांच्या आंत आणि पढील चार कामें १२ वर्षांच्या वयानंतर शिकतां येण्यासारखी आहेत.