पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ घरांतली कामें. mmmmm गुरांना पूर्वचिन्हें होऊ लागली झणजे ती सूक्ष्मतेने पाहून टिपीत जावी. तज्ज्ञाला गुरास दाखवावे, व त्याकरवी किंवा पशुवैद्याकडून त्याचा इलाज करवावा. सांथीचे रोग-गुरांच्या रोगांत पुढील रोग घातुक असतात. १ तोंड येणे, २ खुरांत फोड होणे, ३ फेफसें, ४ काळपुळी, ५ रक्तसूत्र, मा ६ क्षय, व ७ देवी. हे रोग बहुतेक संसर्गाने होतात. संसर्ग टाळण्यासाठी गुरांस गांवाबाहेर कारंटाईनमध्ये ठेवावें. कारंटाईनची व्यवस्था आपले देशांत अद्याप झाली नाही. गांवाबाहेर चोरांची किंवा जनावरांची भीति असते. एकटें मनुष्य रहाण्यास धजावत नाही. तथापि ही व्यवस्था परस्पर सहकारी तत्त्वावर पैसा गोळा करून सहज करता येईल. f ashi प्रकरण १८ वें. प ण बालसंगोपन. मुलें सांभाळण्यास मनुष्याचे अंगी प्रेम आणि कष्ट सोसण्याची शक्ति हे दोन गुण हवे आहेत. हे गुण स्त्रियांचे अंगी निसर्गतः उत्पन्न झालेले असतात; आणखी त्यांचा विकास त्यांच्या लहानपणापासूनच करण्याकडे लोकांची प्रवृत्ति फार जुन्या काळापासून दिसून येते. .. मुलगी ३।४ वर्षांची होते, तो तिच्या हाती बाळाचे बाहुले खेळायाला ह्मणून देतात. ह्याच वेळेस मुलीचें प्रेम अंकुरित होते. तिला ते बाळ कृत्रिम असल्याची काही कल्पना नसते. ती त्याला परोपरीचे उपचार करिते, कुरवाळिते, जपते, त्याला किंचित् धक्का लागला