पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwww प्रकरण १७ वें. १९७ थंडी यापासून त्यांचे संरक्षण न करणे, त्यांस दूषित जागेत ठेवणे, दूषित पाणी पाजणें, दूषित चारा खावयास घालणे किंवा अपुरता अथवा अतिरिक्त प्रमाणाने देणे, वगैरे वगैरे. ह्यापासून ज्वर, शैत्य, खोकला, अपचन, हगवण इ० रोग होतात. तिसरा प्रकार सांथीच्या रोगांचा आहे. हा संसर्गाने * वाढत असतो. त्याला टाळणें मनुष्याचे हाती पुष्कळ आहे. रोगाची पूर्व चिन्हें-दुखणे यावयाचे असले झणजे मनुष्याला जशी पूर्व चिन्हें होतात, तशी गुरालाही होतात. विशेष चिन्हें ही आहेतः (१) त्याच्या अंगाला स्पर्श केला असतां तें भोंवरा करीत नाही. (२) अंगाची कातडी ताठ होते. जेथें नेहमीं वळ पडावयाचे तेथेही ते नाहीसे होतात. (३) नाकपुडीवरील ओलावा नाहीसा होऊन तोंडांतून केव्हां केव्हां लाळ व फेस येतो, आणि डोळ्यांतून पाणी गळू लागते. मनुष्याचा, तसाच गुराचाही, ताप थरमामिटरनें मोजतां येतो. त्याची नाडी पहातां येते आणि श्वासोच्छासांतील फरक जाणतां येतो. पण हे पहाणे आणि रोगाचे निदान करणे कठीण आहे. ह्मणून त्याचा विस्तार येथे करीत नाही. उपचार-गुरांच्या रोगांचे निदान करणे जसें कठीण आहे, तसेंच त्यांचे उपचार करणे, एनिमा देणे, धुरी देणे, औषध चारणे वगैरे कठीण आहे. ते पुस्तकांतली वर्णने वाचून कोणालाही करता येण्यासारखें नाही. त्याला गुरू कडून प्रत्यक्ष काम शिकले पाहिजे. तें बायकामुलींनां साधण्यासारखे नाही. ह्मणून त्या भानगडीत न पडतां

  • जी गुरें उताराच्या भूमिप्रदेशांवर चरतात, किंवा पाने आणि वेली सडून । खराब झालेल्या तळ्यांतले पाणी पितात, त्यांस हटकून साथींचे रोग होतात