पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. mwwwwwwwwwwwww असतां ती जो भयसूचक अंगसंकोच आणि सुकुमार सीत्कार करिते, तो कोणाच्या हृदयाला कंपित करीत नाहीं ! कष्ट सोसण्याचा अभ्यास-मुली सहा-सात वर्षांच्या झाल्यावर बहुतेक मुलींना मुलें सांभाळण्याचे बरेच काम करावे लागते. कारण, गरीब कुटुंबांत मुलांबाळांचा परिवार बराच मोठा असतो, आणि त्यांस सांभाळण्यास गडी-माणसें नसतात; तेव्हां तें काम मुलींच्या वाट्यास येत असते. ते बहुधा त्या सासरी कायमच्या जाऊन राहूं लागेपर्यंत सारखें त्यांच्याकडे असते. ह्यामुळे त्यांना ह्या कामाची संवय लागते, त्यासंबंधाने अनेक प्रकारचे अनुभव येतात, आणि घरांतल्या वडील माणसांकडून सारखें पावलोपावली शिक्षण मिळत असते. हा त्यांचा बाळपणी झालेला व्यासंग व मिळालेला अनुभव त्या सासरी गेल्यावर आणि मातृपदावर आरूढ झाल्यावर किंवा नणदा जावांच्या मुलांस सांभाळण्याचा प्रसंग त्यांजवर आला असता, त्यांच्या फार उपयोगी पडतो. त्यांना मग हे काम मुळीच जड जात नाही. ही चाल फार चांगली आहे. परंतु हिच्यांत एक मोठे वैगुण्य हे आहे की, मुलींच्या आयुष्याची पुष्कळ उत्तमोत्तम वर्षे ह्या कामांत फुकट जातात; आणि त्यांच्या वाढत्या अवस्थेत या कामाचे न झेपणारे आणि अनुचित असे ओझें त्यांच्यांवर पडून, त्यायोगे त्या शरीराने आणि मनानेही दडपल्या जातात. पण, असें आहे तरी त्यांना ह्या कामापासून सबंध सोडविण्याचा विचार करणे घातक आहे. त्यांना हे काम तर आलेच पाहिजे आणि ते शिकण्याचा योग्य काळही हाच आहे. त्याच्या पद्धतीत मात्र काही बदल केला पाहिजे.. ह्मणजे मुलींना हे काम, त्यांचा तो उद्योगच आहे अशा समजुतीने न सांगतां, शिक्षणाचा धडा ह्मणून सांगितले पाहिजे