पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ घरांतली कामें. गुराखी आणि गोचराई-गुराखी शक्य असेल तेथपर्यंत घरदारवाला आणि ज्याला गुरांच्या रोगाची चिकित्सा माहीत आहे, असा ठेवावा. त्याचे नांव, नातेवाईक आणि पत्ता हीं टिपून ठेवावी. त्याचें घर आणि गुरे चारण्याची जागा आपले घरचे कोणीतरी माणसाने एक दोन वेळ पाहून ठेवावी. गायरानांत सावलीला झाडे आणि पिण्याचे पाणी चांगले मुबलक आहे की नाही, हेही तपासावें. त्यांची व्यवस्था नसली तर शक्य असेल त्याप्रमाणे हस्ते परहस्ते ती व्यवस्था करण्यास झटावें. ओढाळ गुरूं-एकादें गुरूं ओढाळ असते, हा त्याचा स्वभाव असतो. अशा गुराला गळ्यांत फासा घालून पाय अडकविल्याशिवाय गत्यंतर नसते. एकादें गुरूं विष्ठाभोगी निघते. त्याला जोपासना करणाराची हयगय किंवा मूर्खता पुष्कळदां कारण होत असते. तरी गुराच्या ह्या संवयीला उत्तेजन न देतां ती हरप्रयत्नाने मोडावी. गुरूं मातारे होऊन किंवा अन्य काही कारणाने उपयोगाचे रहात नाही. तेव्हां त्याला नीटपणे पोसण्याचे सामर्थ्य नसेल, तर पांजरापोळांत पोहोंचतें करून, यथाशक्ति त्या संस्थेला मदत करावी. अशा गुराला घरांत बाळगून आपल्याला आणि त्याला कष्टांत घालू नये. काही व्यवस्था न करतां नुसता त्याचा त्याग करणे पाप आहे. कृतघ्नपणा तर उघडच आहे. गुरांचे रोग-गुरे स्वभावतः शरीराने बळकट आणि निरोगी असतात. ती कुपथ्य करीत नाहीत, किंवा फारशीं आडवाटेला जाऊन रोगाला बोलावीत नाहीत. जखम लागणे, शिंग मोडणे, गर्भपात, वगैरे आपत्ति ह्यांवर क्वचित् येतात. त्यांना जे रोग होतात, ते पुष्कळ अंशी जोपासना करणाराचे दोषाने होत असतात. जसें ऊन किंवा