पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १९५ mni त्याच्यापेक्षां स्वादाला अधिक चांगले असते. कच्च्या दुधांतून काढलेल्या लोण्याचे तूप शेरी १२॥ किंवा १३ छटाक निघते, आणि त्यास ओशटपणाही कमी असतो. दूध दुसरे दिवशी, दही तिसरे दिवशी, आणि ताक चवथे दिवशी खाण्यालायक राहत नाही. लोणी एकादा दिवस जास्त टिकतें. नंतर तें कढवून त्यांतले पाणी नाहींसें केले नाही, तर ते वाशाळतें, कडू होतें, व कुजतें. प्रथमच गाय व्याल्यावर सोयराचे दूध गाईलाच पाजावें ह्मणून पूर्वी लिहिले आहे. सोयेर फिटल्यावर प्रथम दूध काढणारे दुसरे कोणी असेल तर त्याला द्यावें, शेजारीपाजारी व इष्टमित्रांकडे पाठवावें, देवाला निवेदन करावें,ब्राह्मणाला द्या व मग आपण उपयोगांत आणावे, अशी जुनी रीत आहे. वेळप्रसंगी गरीब कुटुंबांत तान्ह्याकरितां दूध मागावयास कोणी येते. त्यास काही मोबदला न घेतां लागेल तितकें दूध खुशीने द्यावे, तसेंच, आपल्याला एक दिवसापुरते ताक ठेवून बाकी राहील तें मागतील त्यांस द्यावे. दृष्ट-एकादे वेळी गुरूं प्रत्यक्ष कारण कांहीं नसतां दूध देण्याचे एकदम बंद करितें. एकादे वेळी त्याच्या आचळांतून रक्त येऊ लागते. गुरूं मनुष्याला पाहून भितें, बुचकळल्यासारखें करितें, व कांपते. तेव्हां गराला दृष्ट लागली, असें ह्मणण्याचा परिपाठ आहे. दृष्ट आहे तसे तिचे उतार, अंगारेधुपारेही आहेत. ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आणि पुष्कळ वेळां ह्या उताऱ्याबिताऱ्यांनी गुरें बरी होतात ती त्यांत सिद्धि असल्यामुळे किंवा उपाय होण्यास आणि गुण घेण्यास एकच गांठ पडते ह्मणून, ह्याचा निर्णय करणे ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर आहे. तरी असा प्रसंग येईल, तेव्हा अंगारेधुपारे पाहिजे तर करावे, पण डॉक्टरकडून योग्य उपायही करण्यास विसरूं नये.