पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ घरांतली कामें. mammar सर्व लोणी निघून येईल.साधारणपणे एक शेर दुधांतून दीड छटाकपर्यंत लोणी निघतें'. ताक-साजुक ताक तसेंच खाण्यास उपयोगी पडते. संग्रहणीच्या रोग्याला तर तें अमृत होय. तापकऱ्यालाही हे ताक देणे पथ्यकारक असते; आणि त्याची कढी निर्दोष होते. तूप करणे-लोण्यांतलें ताक निथळून टाकावे. ते देवाच्या नैवेद्याला व भाकरी बरोबर खाण्यास वगैरे लागेल तसे ठेवून उरेल तें रोज किंवा एक दोन दिवसांआड कढवून त्याचे तूप करावें. तूप खर्चण्यास पुरेसे होऊन उरल्यास बाजारांत पाठवावे किंवा नियमित रीतीने त्याचा कोणास पुरवठा करावा. एक शेर लोण्यांतून सरासरी १४ छटाक तूप निघते. अर्थात् ते बाजारभावाला कमी पडते. पण १ कच्च्या दुधांतून लोणी काढण्याचे एक यंत्र आहे. त्यांत दूध टाकून त्याचा दांडा फिरविला ह्मणजे त्या यंत्राचे आंत रवी असते, ती जोराने फिरूं लागते. त्या योगाने दुधाचे मंथन यथास्थित होऊन थोड्या वेळाने त्या यंत्राच्या वरच्या भागाच्या तोटींतून लोणी बाहेर येऊन पडतें, आणि खालच्या भागांत त्या तोटींतून उरलेले दूध पडते. हे लोणी एकाद्या भांड्यांत दोन एक दिवस तसेंच राखून ठेवितात. मग तें ऊन पाण्यांत मिळवून दुसऱ्या एका यंत्रांत ओततात. ह्या यंत्राने त्यांतला निखालस लोण्याचा भाग वर येऊन ताक बाहेर पडते. हे लोणी काही दिवस टिकावें ह्मणून ह्यांत मीठ मिसळून तिसऱ्या एका यंत्रांत घालतात. ह्या यंत्राने त्या लोण्यांतील पाणी निःशेष बाहेर निघून येते. मग तें लोणी निर्वात केलेल्या टिनांत भरून बाहेरगांवीं पाठवितात. त्याला पुष्कळ दिवसपर्यंत घाण लागत नाही किंवा तें नासत नाही.... -यंत्रांतून लोणी वेगळे होऊन निघालेल्या दुधाचे दही, ताक वगैरे करतां येते; पण त्यास चव मुळीच नसते. ह्मणून ते फार स्वस्त दराने विकतें. - ज्यांचे तोंडी देशी पद्धतीने ताकांतून काढलेले लोणी लागले असते, त्यास यंत्रांतून निघालेले लोणी आवडत नाही.