पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १९३ naamwwmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmwwwaminarran. चमनदही-दूध त्यांत एक छटाक साखर घालून वरप्रमाणे तापवावें, विरजण घालावें, व वर मलमलीचे बारीक फडकें दुधास लागून भांड्याचे काठावर घालावे. त्यावर हलकी सुवासिक फुलें ताजी सुमारे अर्धा छटाक पसरावी. हे दही स्वादिष्ट आणि सुगंधि होते. गंगाजमनी दही-मातीचे परळांत एक उभी आणि एक आडवी अशा दोन अंगच्याच खांचा करून त्या खाचांत टिनाचे पत्रे बसवावे, ह्मणजे यांत ४ घरे होतील.प्रत्येक घरांत विरजावयाचें दूध घालून विरजण मिळवावे आणि ४ घरांत ४ पदार्थ घालावे. एकांत साखर, दुसऱ्यांत किंचित् मीठ, तिसऱ्यांत मीठ जिरे, मिन्ये व चवथ्यांत आणखी काहीं. दही जमण्याच्या बेतास आले ह्मणजे टिनाचा पत्रा काढून घ्यावा. थोड्या वेळाने दही जमून सारखे होईल. ह्याचा चमत्कार असा असतो की, दहीं दिसण्यांत सारखे दिसते आणि चवीला मात्र निरनिराळे स्वाद लागतात. लोणी काढणे-जमलेल्या दह्यापैकी विरजणाला, खाण्याला, किंवा कालवणाला वगैरे जरूरीपुरते काढून ठेवून बाकी दह्याचें तें राहील त्या मानानें रोज, एक दिवसाआड, किंवा दोन दिवसांनी ताक करावें. डेरा, रवी व सभोवतालची जागा स्वच्छ असावी. डेयांत दहीं ओतावे. शेरी दोन शेर पाणी ऊन, कोंबट किंवा थंड ( हवेत थंडी किंवा गरमी असेल त्या मानाने ) घालावें. रवी खांबाला अडकवून तिने ते दही घुसळावें ह्मणजे त्यांतून लोणी सुटते व त्याच्या गोळ्या रवीभोंवतीं जमू लागतात. त्या हाताने गोळा करून वाडग्यांत ठेवाव्या. लोणी निःशेष निघाले नाही असे वाटले, तर शेरी शेरभर ऊन पाणी आणखी घालून पुनः घुसळावे ह्मणजे असेल नसेल तें