पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ घरांतली कामें. wwwmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm ही एखादें दुधाला तार येते, याचे कारण दुधाची अस्वच्छता हे होय. गरमीचे दिवसांत दूध ठेविल्या ठेविल्याच आंबुसते किंवा नासते. याचे कारण दुधांतला आंबट अंश गरमीने लवकर वाढतो हे असते. दूध विरजण्याचे आणखी काही प्रकार आहेत. जसें एक प्रकारचे गवत आहे तें दुधांत फिरविणे, दुधी नांवाच्या वनस्पतीच्या दुधाचे किंवा सल्फ्यूरिक आसिडचे थेंब घालणे, इंग्रजी रुपया टाकणें, दूध चुलीवर असतांच लिंबाचा रस किंवा ताक, मीठ वगैरे टाकणे, वगैरे. पण अशा कृतीने जमविलेल्या दह्याला, रीतसर जमविलेल्या दह्याचे माधुर्य येत नाही. ह्याशिवाय एक शास्त्रीय प्रकार दधिजंतु दुधांत. मिळवून दही जमविण्याचा आहे, पण तो बराच श्रमसाध्य आहे. - दूध केवळ लोणी काढण्याकरितांच विरजावयाचे असते, तेव्हां दुधांतली मलई आणि त्याखालचे जवळजवळचे थोडे दूध घेऊन वेगळे विरजावें. असे करण्यापासून लोणी काढण्याचे काम अंमळ सोपें होते आणि मलईशिवाय विरजले, तरी त्याची किंवा त्याच्या ताकाची रुचि कमी होत नाही." चक्कादहीं--दूध आटवून एक शेराचे पाऊण शेर करावें. नंतर तें थोडा वेळ तसेंच निखाऱ्यावर राहू द्यावें. खरपूस तापून लाल झाले ह्मणजे निववून मातीचे कुंडयांत, हंडीत वगैरे विरजत घालावें; ह्मणजे ते चांगले घट्ट जमून येते. १ सामान्यतः गाईचे दुधांत शेकडा ८७ आणि मशीच्या दुधांत ८१ पाण्याचा अंश असतो. आंबटाचा अंश गाईंच्यांत शेकडा तीन आणि ह्यशीच्यांत ६ असतो. मीठ गाईच्यांत ७५ आणि ह्यशीच्यांत ९ इतकें असतें.