पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० घरांतली कामें. दुधाचा फेस जिरल्यावर (हा जिरण्यास प्रथम काही दिवस पांच चार मिनिटे लागतात. भांडे हालविल्याने फेस लवकर जिरतो. ) तें धातूच्या सूक्ष्म छिद्रांच्या गाळण्याने किंवा जाड खादीच्या स्वच्छ फडक्यांतून गाळावे. उद्देश हा आहे की, दुधामध्ये केस किंवा धुळीमुळे रज उडून पडले असतील, तर ते पाहून बाहेर टाकतां यावे. ह्मणून गाळणे आणि गाळण्याचे भांडे स्वच्छ पाहिजे. त्याला कसलाही वास नसावा. भांडे कोरडे असावें. दूध गाळल्यावर ते तसेंच ठेविलें असतां किंवा चुलीवर तापत ठेविलें असतां, अर्थात्च त्यांत पुनः केरांतले रज उडूं नयेत. धारोष्ण द्ध--धारोष्ण दूध प्यावयास घ्यावयाचे, तर तें धारेतली उष्णता मोडली नाही, तोच दिले पाहिजे. फेस जिरण्याची व गाळण्याची वगैरे वाट पाहूं नये. धार काढतेवेळीच भांडे, गोठा, गुरूं आणि दूध काढणारा या चौघांची स्वच्छता आणि निरोगिता पहिले प्रतीची असेल, तरच धारोष्ण दुध पिण्याजोगें असतें. दूध तापविणे—कच्चे दूध थंड हवेत बराच वेळ टिकते. परंतु हवेत किंचित् गरमी झाली असतां दूध नासू लागते. ह्मणून तें तापवून ठेवणे हा उत्तम पक्ष आहे. एक उकळी चांगली येईपर्यंत दूध तापवावें. तापल्यावर तें लागलेंच थंड करून ठेवावे. हवा गार असल्यास दूध गार करण्यास कांही वेगळी खटपट करणे नको, पण हवेत उष्णता असली, तर दुधाचे भांडे गार पाण्यात घालून ठेवावें. उबट दूध तसेंच झांकून ठेविलें असतां नासू लागते. दूध आंबू नये ह्मणून त्यांत कोणताही पदार्थ घालण्याची अगदी अवश्यकता नाही. ध स्वाभाविक स्थितीत ठेवण्याला दोन उपाय आहेत. एक स्वच्छता आणि दुसरा थंड ठेवण.