पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १८९ त्यामुळे तिला व्यथा होऊन दूध काढणाऱ्याला ती शिंगें मारिते, लाथा झाडिते व दूध आचळांत येऊंच देत नाही. एकादी गाय वासराला देखील सुखाने पाजीत नाही. अशा गाईस स्थिर व उपद्रवशून्य करण्यास तिचे मागील पाय बांधणे, त्यास भाला घालणे, कचित् तीस ताडण करणे, असले उपाय योजावे लागतात. पण हे उपाय सारखे करीत गेले असतां गाईला दुधाचा पान्हा कमी होत जातो.. व तिला जी वाईट संवय लागते, ती जन्मभर तशीच राहते. दूध काढण्याची एक युक्ति आहे. ती ज्यास साधते तो गाईंचे आंचळाला न दुखवितां सहज आणि लवकर दूध काढितो. दुसऱ्याला ती युक्ति साधली नाहीं झणजे गाय केव्हां केव्हां एका हाताची होते. ही गोष्टही. अडचणीची असते.ह्मशीचे दूध काढण्यास इतके प्रयास पडत नाहीत. दूध काढण्याचे यंत्र-अलीकडे दूध काढण्याचे आणि तें भांड्यापर्यंत नेऊन पोचविण्याचे यंत्र निघाले आहे. ते यंत्र जनाव-- राच्या आंचळाला लावून दुसरीकडे दाबीत गेलें ह्मणजे अति थोड्या वेळांत आंचळांतून दूध निःशेष ओढिले जाऊन नळीच्या द्वारे भांड्यांत येते. नाठाळ गाईसंबंधाने ह्या यंत्राचा उपयोग करण्यास केवळ तिचे मागील पाय बांधणे पुरे होते. हे यंत्र हाताने चालविण्याचे आणि वाफेच्या एंजिननें चालवण्याचेही असते. ह्या यंत्राने दूध निःशेष दुहिले जाण्याशिवाय वेळेची आणि श्रमाचीही पुष्कळ किफायत होते. पण त्याला गाई-मशी पुष्कळ पाहिजेत. ह्या यंत्राला ७५ रु० किंमत पडते. - दुधाची व्यवस्था. धार काढल्याबरोबर दुधाचे भांडे घरांत न्यावें. तें खुल्या, हवाशीर व उजेडाच्या जागेत ठेवावे. दुगंधि, कोंदट किंवा अंधेया जागेत ठेवू नये.