पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ घरांतली कामें.ए . wammmmm - धार काढतेवेळी तोंडांत विडी किंवा तंबाकू धरूं नये, व मधून मधून बोटें दुधांत बुडवू नयेत. - दूध काढिल्यानंतर वासरास सोडावे. वासरूं जसजसे मोठे होईल, तसतसे त्याच्या पोषणाला दूध अधिक सोडीत जावें. एक आचळ सोडायाचे, दोन सोडायाची, असे नियम करणे नको आहे. वासराला तेवढे सगळे दूध नको असते. तीन महिन्यांनंतर त्यास चारा जास्त देऊन त्याचे दूध सोडविण्याचा प्रयत्न करावा. धार काढतांना दूध रक्तमय, तंतुमय, किंवा निराळ्याच रंगाचें दिसू लागले, तर ते सगळे दूध टाकून द्यावें. भांड्यांतलें दूध थोड़ें असो की पुष्कळ असो, कांहीं आकस्मिक कारणाने घाणेरडे झाले, तर ते गाळून घेण्याचा प्रयत्न न करतां टाकून द्यावे. रोगी गुरांचे, विशेषतः सांसर्गिक रोगाने ग्रस्त झालेल्यांचे दूध वरांत अगदी उपयोगांत आणूं नये; किंवा वासराला पाजू नये. तें काढून जमिनीत पुरून टाकावें. गाई-मशींच्या मधील भेद-गाईचे दूध अंमळ पातळ आणि पिवळसर रंगाचे असते. मशीचे दूध दाट आणि शुभ्र रंगाचे असते. मशीच्याच दूधाचे चक्का दही चांगले जमते. त्याच दुधाची रबडी व खोवा होतो; आणि त्यांतच लोणी विशेष निघतें. नाठाळ गाय-कांहीं गाई नाठाळ असतात. त्या धार काढू देत नाहीत. प्रायशः पहिलटकरणीची धार काढणे कष्टकारकच खरें. तिची आंचळे प्रथम प्रथम पिळली जातात, तेव्हां ती दुखतात. १ अशा रीतीने काढलेले दुधाचे दही चांगले असते आणि त्यांत लोणी अधिक निघतें असा लोकांचा अनुभव आहे.