पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १८७ आणि त्यापासून सगळे दूध बिघडण्याचा संभव असतो. नंतर वासरास गाईचे पुढच्या उजव्या पायास बांधून गाईस त्याला चाटूं द्यावें. धार काढणाराने गाईचे डावे बाजूस बसून साधेल तसें एका हाताने किंवा दोन्ही हातांनी दूध पिळून काढावे. दुधाचे भांडे दोन्ही गुडघ्यांत मजबूत धरावें. ते भांडें अरुंद तोंडाचे असावें. दुधाची चरवी कांसेखाली जमिनीवर ठेवणे धोक्याचे आहे. गुरूं काबूत नसले तर ते एकादे वेळी ते भांडे लाथाडून दूध सांडील.. एका भांड्यांत दूध काढतां येण्यासारखें नसले, तर भांडी अधिक करावी. जे भांडे भरेल तें लागळेच दूध ठेवण्याचे जागी पाठवून द्यावे. गोठ्यांत दुधाची ओताओत करीत बसू नये. । दूध काढतेवेळी पाळीव कुत्रे, मांजर, किंवा रिकामटेकडी माणसें सभोवती असूं नयेत. 'धार काढण्यास आंचळे बोटांनी ओढू नयेत किंवा आंगठा मोड़न त्याच्या पेयाने ती दाबू नयेत. मुठींत आंचळ धरून पिळावें. जोडीची आंचळे पिळू नयेत. पहिले आणि तिसरें, दुसरे आणि चवथें पिळावें. धार नियमित वेळी, नियमित पद्धतीने, सारखी, सपाट्याने, मका-- व्याने, संपूर्ण काढावी. रेंगाळू नये; किंवा मध्ये थांबू नये. तसे करणे गाईला आवडत नाही. - दूध सकाळ-संध्याकाळ दोन वेळां काढावें. गुरूं जास्त दुधाळ असले, तर ३।४ वेळां काढण्यास हरकत नाही. जास्त दुधाळ गुराचे दूध आंचळांत थबथबून येते. ते काढण्याला पिळण्याचे श्रम पडत नाहीत. पहिलटकरणीचे दूध कादिल्यानंतर दिवसांतून एकदां तिच्या कांसेला एरंडेल चोळावे. gole