पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ घरांतली कामें. खदखदला ह्मणजे खाली काढून घ्यावा व कोंबट झाला ह्मणजे खायाला घालावा. आठ दिवसानंतर गाईला फार भूक सुटते, तेव्हां तिला यथेच्छ खाऊ घातले पाहिजे. मशीला हरीरा गाईचे दुप्पट द्यावा. सोयेर-गाई मशींचे सोयेर ३ दिवस, ५ दिवस किंवा कोणी ८ दिवस मानितात. ह्मणजे हा दिवसांत तिचे दूध घरच्या कामास आणीत नाहीत. तरी दूध काढलेच पाहिजे. कारण, ते तिच्या कांसेंत राहिले असतां तिला त्रास होतो. वासराला तिसरे दिवशी क्षुधा वाटते. तेव्हांपासून त्याला तिचे आचळास दिवसांतून तीन वेळ लावावे आणि फाजील दूध काढून वरील हरीरा शिजतांना त्यांत घालून तिचे तिला खाऊ घालावें. पहिले दोन दिवसांचे दुधांत क्षाराचें प्रमाण अधिक असते; ह्मणून ते खाण्यापिण्याचे कामी येत नाही. सोयेर संपल्यावर तिला स्नान घालून स्वच्छ करावें, आणि तिचे दूध कामास आणावें. धार काढणे-धार काढणाराची वस्त्रे आणि तोंडहीं निर्मळ असावी. त्याने आपले हात, दुधाचे भांडे, गाईची कांस आणि आंचळे कढत पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडी करावी. गोठ्यांतली जागा झाडून स्वच्छ केलेली असावी. निदान गाय सोडून धार काढण्यापुरती तरी स्वच्छ जागेत न्यावी. गाईपुढें खाण्याचे ठेवावें. । प्रथम वासरास सोडून गाईस पान्हा आणवावा. गोवत्साने उच्छिष्ठ केलेले दूध आरोग्यदृष्टया गुणकारी होत असते. ( जर वासरूं प्रथम लाविलें नाही, तर प्रत्येक आंचळाच्या पहिल्या दोन तीन धारा खाली सोडाव्या. भांडयांत घेऊ नयेत. त्यांत पाणी फार असते. १ तें चुलीवर ठेवल्याबरोबर गोठतें. तें ताटांत घालून त्याच्या वड्या कापतात. त्यांस खरवसाच्या वड्या ह्मणतात.