पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १८५ wwwwwwwwwww marrrrrrrrrrrrammmm गाभण गाईचे रक्षण-गाभण असलेल्या गाई-मशीचे यत्नाने पालन करावें. तिला फार वेळ उपाशी ठेवू नये. तिला पांचवा महिना लागल्यापासून तिचे खाणे कमी होते. त्या वेळेपासून तिला कसदार खाणे-चुणी, कडबा वगैरे-घालावें. नविणे गाय व्यायला झाली ह्मणजे तिची कंबर शिथिल होते, ती आळसते, कांस सोडिते, मलमूत्र लवकर लवकर सोडूं लागते, प्रसववेदना होऊ लागली ह्मणजे ती पुच्छ उंच करिते, व ऊठ बैस करिते. त्यावेळी तिचे दावे सोडून आडोसा करावा. वासरूं बाहेर पडते, तेव्हां प्रथम त्याचे पुढील दोन पाय बाहेर येतात आणि मग वाकीचे अंग हळू हळू निघते. गाईला स्वाभाविक प्रसूतीत मदतीची गरज नसते. गाय बहुधा बसून प्रसवते आणि थोडे वेळाने आपले आपण उठून उभी रहाते. ती आपले वासरास चाटून त्याचे अंगाची सर्व घाण काढून स्वच्छ करिते. ते तिला करूं द्यावे. तों पावेतों आपण वासराला स्पर्श करू नये. पण वासरूं झाल्यानंतर जी वार बाहेर पडते ती गाईला खाऊ देऊ नये. ती तिने खाल्ली असता दूध आटते ह्मणतात. तिला तीन दिवस थंड पाणी देऊं नये किंवा आणखी काही थंड पदार्थ देऊ नये. प्रसवाचे कष्ट दूर करण्याकरितां अर्धशेर मीठ आणि एक छटाक आले किंवा सुंठीचे चूर्ण वाटून कोंबट पाण्याबरोबर कालवून पाजावें ह्मणजे तिला जुलाब होऊन कष्ट दूर होतात. पुढे ८ दिवसपर्यंत तिला हरीरा (ओषधियुक्त गोडसांजा) द्यावा. त्याचे प्रमाण, गव्हांचा भरडा सवाशेर, तूप अतपाव, गूळ तीन पाव, सुंठ एक छटाक, जिरे पांढरे दीड छटाक, हळद दीड छटाक. भरड्याला तूप चोळावें. तो एका बोघण्यांत भाजून त्यांत गूळ मिळवावा व पाणी घालावे. पातळ झाल्यावर ओषधी मिळवाव्या.