पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ घरांतली कामें. wwwmarana mmmm nnnnnnnnnnnnnnn जाफराबादेसारख्याच अंगापिंडाने मोठ्या, पण त्यांपेक्षां पुष्कळ नीटस व डौलदार असतात. त्यांची शिंगे मेंढ्याच्या शिंगांसारखी आंत वाढलेली असतात. कांस मोठी व डौलदार असते. ती २५ शेरपर्यंत दूध देते आणि तिची किंमत १५० पासून २०० रुपयेपर्यंत असते. दुधाळ गाईचे लक्षण-१ ज्या गाईचे डोके मोठे, छाती आणि कंबर रुंद, पोट मोठे, त्वचा कोमल ( पातळ ), केस पातळ, शेपटी लांब व गोंडेदार, बांधा सुटसुटीत, व कांस आणि सड मोठे असतात, ती गाय बहुधा चांगली दुधाळ असते. २ पांढऱ्या रंगाची, आखुड शिंगांची गाय बहुधा दुधाळ असते. गाईच्या कांसेपासून एक शीर हृदयाकडे जातेशी दिसते. ती ज्या गाईची जितकी जाड आणि लांब गेलेली असेल, तितकी ती गाय जास्त दूध देणारी असते. जिची ती शीर सर्पाकृति झणजे वांकडी गेली असेल किंवा जिला कांसेच्या बाजूस गांठी गांठी दिसतील, ती गाय फारच दूध देणारी असते. ३ जिची मान बारीक, मागील धड मोठे, पाय बारीक व आंखूड, शेपूट लांब व गोंडेदार असते व जी स्वभावानें गरीब, निरुपद्रवी ऐटीने चालणारी, व पुष्कळ खाणारी असते, ती चांगली दूध देणारी असते. ४ जी गाय फार लठ्ठ असते ती बहुधा फार दूध देत नाही. दुधाळ मशीचे लक्षण-ज्या मशीचा रंग काळा, केस विरळ, डोके, पोट, कांस, आणि आंचळ मोठे व वक्ष आणि कटि रुंद असते, ती अॅस पुष्कळ दूध देणारी असते. भुरी हँस लोण्याला आणि काळी लैस दुधाला चांगली असते असें ह्मणतात.