पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. wrrrrrrrrrrammmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmxm. काठियावाडांतल्या गीरच्या गाई ह्या मध्यम बांध्याच्या आणि देखण्या असतात. त्या बारा शेरपर्यंत दूध देतात. ह्यांचे विण्याचा काही नियम नाही आणि ह्या लवकर आटतात. - पंजाबांत हंसी किंवा हरीयाना खेताच्या पांढऱ्या रंगाच्या गाई मोठ्या ऐटदार व सुंदर आकृतीच्या असतात. ह्यांचे इतके दूध दुसऱ्या कोणच्याही खेताची गाय देत नाही. -_मांटगोमेरी ( पंजाब ) च्या गाई हंसीसारख्याच पुष्कळ दूध देणाऱ्या आहेत. ह्या काळसर, लाल, शुद्ध पांढन्या किंवा करड्या रंगाच्या असतात. कबऱ्याही पुष्कळ असतात. ८ शेर दूध देणारी गाय तेथे ६०६० रुपयांला विकते. परंतु पहिल्या प्रतीच्या गाईला १०० किंवा अधिक रु० पडतात. दि मारवाडी-नागोरच्या गाई आकृतीने काठियावाडीसारख्या, पण डौलदार, पांढऱ्या रंगाच्या व शरीराने सुटसटीत असतात. नेमाडी, माळवी वगैरे जाती वरील जातींच्या खाली आहेत. मा मशींच्या जाती--दक्षिण आणि माळवा येथील लांब अणकुची. दार शिंगांच्या मशी उत्तरेकडील मशींपेक्षां दुधाला काही अंशी कमी असतात. गुजराथेतल्या खेडा जिल्ह्यांतल्या मशी ( यांस सुरती ह्मणतात) ३० शेरपर्यंत दूध देतात. त्यांस किंमत १२५ पासून १४० रु. पर्यंत पडते. जाफराबादी किंवा काठियावाडच्या मशी--गीरच्या डोंगरी प्रदेशांत होतात. या पंधरावीस शेर दूध देतात. किंमत रु. १५० पडते. दिल्लीच्या उत्तम राशी ह्मणून ज्या प्रसिद्ध आहेत, त्या दिल्लीचे पश्चिमेस रोहटवा येथे होतात. ही जात संयुक्तप्रांत, पंजाब, राजपुताना आणि सिंधपर्यंत पसरली आहे. त्यांतल्या चांगल्या मशी