पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ घरांतली कामें. rammwwwxxxmamarrrrrrrm मध्यवर्ती मोठ्या गांवाला भरणाऱ्या गाई-मशींच्या बाजाराला जाऊन निरनिराळ्या जातींची जनावरें एकत्र एकाच काळी पुनः पुनः लक्षपूर्वक पाहिली, ह्मणजे त्यांची पारख करण्यांत फारशी चूक होणार नाही. जनावर घेतांना एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी ही आहे की, एका हवापाण्यांत वाढलेले जनावर त्यांच्याहून भिन्न अशा हवापाण्यांचे देशांत जगत नाही, निदान बदललेल्या देशांत पहिल्या देशच्या इतकें दूध देत नाही. दुसरी याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट मटली ह्मणजे त्याच्या निरोगीपणाची-विशेषेकरून त्याला क्षयरोग नाही, त्याबद्दलची परीक्षा करविणें-ही होय. ही परीक्षा जाणत्या माणसांकडून करविली पाहिजे. दुआब मधील देशांत आणि घाटमाथ्यावर जेथे पाऊस फार पडतो, तेथें गुरें भिकार व दुबळी निपजतात. जेथे पाऊस ३०।४० इंचपर्यंत होऊन तो वाहून जात असतो, तेथे जनावरांना वैरण चांगले मिळून ती चांगली वाढतात. शुद्ध जातीच्या गुरांचा रंग बहुतेक पांढरा किंवा करडा असतो. लाल आणि काळा थोडा. बंगाल्यांतली गुरे मातबर नसतात. मद्रासचे नेलोरचे खेत दुधाळ गाईविषयी प्रसिद्ध आहे. येथील गाई मोठ्या, पांढऱ्या किंवा करड्या रंगाच्या असतात. मध्य प्रांतांतील ‘अरवी' चे खेताचे नेलोरशी इतर बाबतीत बरेच साम्य आहे. ह्यास दूध मात्र त्यांचे इतके नसते. सिंधी देशांतील 'सिंधी' खेताच्या गाई लहान बांध्याच्या काळसर तांबूस रंगाच्या असतात. काहींच्या अंगांवर पांढरे डाग असतात. उत्तम गुरे मध्यम बांध्याची असतात. ही पंधरा शेरपर्यंत दूध देतात.