पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १८१ अपचन होऊन ते एखादेवेळी मरेलही. स्पर्शजन्य रोगाने पछाडलेलें जनावर निरोगी जनावराच्या शेजारी बांधू नये. उष्ण प्रदेशांत उष्ण दिवसांत गाय आणि तिच्या कुटुंबीयांला रात्रीचे वेळी चौकांत बांधावें, वर्षा आणि शिशिर ऋतूंत त्यांचे गोठ्यांत ऊन राहील अशी तजवीज करावी. शक्य असल्यास कांबळे किंवा गोणपाटे वगैरे आच्छादन त्यांचे पाठीवर बांधावें. शिंगांच्या मुळाशी तिळाचे तेल चोळल्यानेही शैत्यांची बाधा कमी होते म्हणतात. गुरांना रागें भरल्याने, ओरडून बोलल्याने, किंवा त्यांचे भोंवतीं गडबड केल्याने ती चिडतात आणि त्याचा परिणाम दुधावर होतो. धार काढण्यासाठी किंवा चारण्यासाठी त्यांस नेतांना पळवू नये. त्यांचे चालीने त्यांस चालू द्यावे. दुभत्या जनावरांची निवड--गाय किंवा झैस घेतांना तिच्या शुभाशुभ चिन्हांच्या आणि वेळ-मुहूर्ताच्या विचाराशिवाय आणखीं ती दुधासाठी घ्यावयाची की वासरासाठी, याचा विचार करणे अवश्य आहे. कारण कांही जनावरे दुधाळ असतात व कांहींचे बच्चे मात्र घेण्यासारखे असतात. जनावर दुधाळ आहे की नाही, याची परीक्षा त्याचे जातीवरून करता येते. एकाच जातीचे दोन जनावरांचे दुधाचे प्रमाणांत वयपरत्वें न्यूनाधिकता होते; ह्मणून या बाबतीत काही माहिती खाली दिली आहे. ती लक्षात ठेविली आणि एखाद्या १. जी ( १) आपलें दूध आपणच पिते ( २) आपलेखालील जमीन आपले खुराने खोदिते किंवा (३) जिला आंचळे असतील अशी गाय अशुभ समजावी. ज्या ह्मशीला भवरी किंवा नागीण असते ती अशुभ. २ इंग्लंडांत तर आतां दहा शेरांखाली दूध देणारी गाय दुधाकरितां कोणी बाळगीत नाही.