पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. दुप्पट पाणी पिते. मशीचे प्रमाण गाईच्या दीडपट आहे. वासराला पहिल्या महिन्यांत पाणी पाजावे लागत नाही. 1 गुराला पाजावयाचे पाणी डबक्यांतलें, पाने पडून सडलेले, चिखलमातीचे, धुणे धुतलेले, मळकट भांड्यात ठेवलेले, फार शिळे, गार, जड, खारें, असें असू नये. झऱ्याचे किंवा विहिरीचे स्वच्छ ताजे पाणी पाजावें. पहाटेस थंडीची वेळ निघून गेल्यावर, सायंकाळी थंडावा होण्यापूर्वी, आणि पुन: मधल्या वेळी. व्यायाम—गुरांना सोय असली, तर दिवसास बाहेर चरण्यास जाऊं द्यावे; त्यांना बाहेर पाठवायाचें तें मुख्यत्वें चारण्याकरितां नव्हे, तर व्यायामाकरितां आहे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. जनावर बाहेरून जाऊन आल्याने आनंदित होते. बाहेर सोडण्याची सोय नसेल तर त्यास एक-दोन दिवसांआड थोडे फिरवून आणावें. वाड्यांतले वाड्यांत तरी फिरवावें. निदान गोठ्यांत मोकळे ठेवण्याची सोय करावी. एके जागी दिवसभर उभे राहिल्याने अन्नपचन होत नाही, वं गुरांचे पायांत रस उतरून ते भरून येतात. आणि तशी संवय पडली असता, मग त्यांस फारसे चालवत देखील नाही. वासरांना तर मोकळे सोडलेच पाहिजे; नाही तर त्यांची वाढ खुंटते. विश्रांति--गाय रात्रीची विश्रांति घेते. त्याकरितां तिच्या ठाणावर भुसा किंवा गवत २।३ इंच जाड पसरावें. वाईट, घाणेरडा चारा पसरला असतां सुखाऐवजी त्यांस दुःख होईल. सायंकाळी गोठ्यांत दीपदर्शन अवश्य झाले पाहिजे. रात्रभर प्रकाश ठेवण्याची मुळीच अवश्यकता नाही. वासरूं गाईचे फार जवळ बांधू नये. कारण, त तिला दुधासाठी वारंवार त्रास देईल. कदाचित् सुटूनही थानास लागेल; आणि अतिशय दूध त्याचे पोटांत गेले असता त्यापासून