पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १७९ पेंड गाईपेक्षां मशीला विशेष मानवते. सरक्या-पेंडेचा विशेष गुण दूध काढण्याचा आहे. सरक्यांनी मशी दूध कमी देतात खऱ्या, पण या दुधांत लोणी ज्यास्त असते. गाजर-कच्चे गाजर आणि त्याची पाने पुष्टिकारक असतात. मीठ-गुरांना दाणा चारतांना त्याबरोबर थोडे मीठही घालावें. रोजचे प्रमाण-चांगल्या दुधाळ गाईला सुकें गवत एक दिवसाला १० शेर पाहिजे. हिरवे याचे दुपटीने आणि सायलेज २५ शेर हवे. हेच प्रमाण सुक्या आणि ओल्या कडब्याचे आहे. त्याशिवाय तिला रोज दोन अडीच तोळे मीठ दिले पाहिजे. वर लिहिलेली प्रमाणे सामान्य आहेत. दुभत्या जनावरांचे शरीर आणि वय असेल, त्या मानाने या प्रमाणाहून कमीअधिक वैरण लागणे शक्य आहे. वेळा-गुराला दिवसभरांत चारावयाचा चारा सगळा किंवा वारंवार थोडाथोडा किंवा अनियमित रीतीने केव्हां तरी घालू नये, गुरूं खरेखरें पहिल्या व उत्तर रात्री पोटभर चारा खात असते. त्या दोन्ही वेळां भरपूर चारा त्याचे पुढे घालावा. मध्यान्हानंतर थोडथोडा एक किंवा दोन वेळां धार काढण्याच्या आरंभी देणे, हा उत्तमपक्ष आहे. मागाहून दिल्यासही हरकत नाही. पाणी--गाईला दिवसांतून मण-सवामणपर्यंत पाणी लागते. ते तीन वेळां करून द्यावे. दूध देणारी गाय तें न देणाऱ्या गाईच्या १. कोणी असें ह्मणतात की, जनावराला आपले वजनाच्या दशांश खाण्यास लागते आणि तें विसांश दूध देते.