पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. •rama हिरवे गवत चांगली काडी धरूं लागल्यावर घालावे आणि आरंभी आरंभी वाळलेल्या गवताबरोबर ते थोडे थोडे मिसळून द्यावें. वाळलेले गवत-हिरवे गवत फुलून वाळण्यापूर्वी कापून पेंड्या बांधून नीट रचून ठेविले असतां ते बारा महिने चांगले राहते. ह्मणून व्यापारी लोक तसें करीत असतात. असें गवत जरूरीप्रमाणे पुरविणाऱ्या व्यापाऱ्याशी हंगामावर ठरवून घेतले असतां उन्हाळयांत सुख होते. असे करण्याची सवड नसल्यास घरगुती गंजी लावून ठेवावी, किंवा थोडे थोडके गवत असेल तर कोठ्यांत भरून ठेवावें. - ल्यूसन किंवा विलायती गवत-हें उन्हाळ्यांत सुक्या गवताबरोबर गुरांना देतात. हे गवत फार पुष्टिकारक असते. पण दुभत्या जनावराला ह्या गवताचेच खाद्य देणे अपायकारक आहे. ते फार थोड्या प्रमाणापासून द्यावे लागते आणि कमी कमी करीत जावे लागते. तें एकदम चालू किंवा बंद करण्यापासूनही गुरांना अपाय होतो. ते गवत दिवसाला ५ शेरांहून अधिक देऊ नये. कडबा-जोंधळा, बाजरी आणि मका यांचा कडबा गुरांना घालतात. ह्या तिहींत जोंधळ्याचा कडबा उत्तम प्रतीचा असतो. ज्वारीच्या कच्च्या कडव्याविषयी कित्येक साधारण नियम लक्षांत ठेवण्यासारखे आहेत ते हे:। १ हा हंगाम कार्तिकांत असतो. वर्षाला गवत किती लागेल याचा अंदाज गुरांची संख्या आणि त्यांचे रोजचे खाण्याचे सरासरी प्रमाण यांवरून करतां येतो. एका गुराला १ वर्षाला साधारणपणे ९० मण गवत पुरें होतें. __गवतासाठी कुरण घ्यावयाचे तर ते एका गाईला एक एकर एका वर्षाला पुरतें, एका एकरांत ओलें गवत ३०० मण, आणि वाळलेले ९० मण निघतें असा अंदाज धरून घ्यावे.