पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १७५ mumo ३ पेंड, सरक्या, गाजरे, हिरवा बूट वगैरे. पा. गवत-गवताच्या मुख्य दोन जाती आहेत. एक जमीनीवरचें. हे नरम, अधिक रसदार आणि सकस असते. दुसरे डोंगरी. ह्याची काडी राठ, रुक्ष आणि कमी सकस असते. गवतांत एक मोठा फरक कापणीमुळे होत असतो. जे गवत त्यास फुले येण्यापूर्वी आश्विन--कार्तिकांत कापलेले असते तें सरस व चांगले असते. जें फुले आल्यावर किंवा वाळल्यावर कांपलें जातें तें नीरस व वाईट असते. ह्याशिवाय गवतांचे वर्ण, आकृति, गुण आणि रुचि यांच्याप्रमाणे किती एक पोटभेद समजले जातात. ते निरनिराळे देशांत निरनिराळ्या नांवांनी प्रसिद्ध आहेत. निरनिराळ्या गवतांच्या बारीक भेदांची माहिती आपले किंवा शेजारचे एकाद्या मोठ्या गांवांत गवताचा व्यापार करणाऱ्यांकडून मिळविली असतां तिजपासून चांगले मालाची निवड आणि भावामध्ये किफायत ही दोन्ही साधता येतील. साधारणपणे. जें गवत नरम, हिरवें, रसदार, बारीक काडीचें, लांब व थोडया पातीचे असते ते चांगले असते. लाल फुलांचे,कुसळांचें, जाड दांडीचें, मिसळणांचे, ओढ्याच्या कांठच्या पाणथळांत उगवलेले, अतिहिरवे गार, पाती झडून शुष्क काड्या राहिलेलें, लहान, खुजट व पावसाने भिजून काळे पडलेले किंवा जुनें गवत निकृष्ट प्रतीचे होय. असें गवत होता होईतों घेऊ नये. हिरवे गवत-हिरवे गवत पावसाळ्याचे आरंभी उगवते. तें गुरांना चारूं नये. कारण, तेव्हां त्यांत पाण्याचा अंश अतिशय असतो. असें गवत खाल्ल्याने गुरांना हगवणीसारखे रोग होतात. त्यांचे पोट फुगतें, दूध पातळ होते, आणि त्या दुधांत सत्वांश नसतो. ह्मणून